मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

शिवसेना आमदाराला अडकवलं सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात; आरोपीला राजस्थानातून अटक

शिवसेना आमदाराला अडकवलं सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात; आरोपीला राजस्थानातून अटक

Crime in Mumbai: मुंबईतील शिवसेनेच्या एका आमदाराला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवल्याची (Shivsena MLA trapped in Sextortion) धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला राजस्थानातून अटक केली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 23 नोव्हेंबर: गेल्या काही दिवसांपासून देशात सायबर गुन्ह्यांची (Cyber Crime) अनेक प्रकरणं समोर येत आहेत. विशेषत: सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्लील व्हिडीओ कॉल (Obscene video call) करून ब्लॅकमेल (Blackmail) केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यानंतर आता थेट शिवसेनेच्या एका आमदाराला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात (Shivsena MLA trapped in Sextortion) अडकवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला राजस्थानातून अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मोसमदीन मेव असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोसमदीन याने 20 ऑक्टोबर रोजी रात्री फिर्यादी आमदाराला एक महिला बनून मेसेज पाठवला होता. तक्रारदार आमदारानं प्रतिसाद देताच दोघांमध्ये संवाद सुरू झाला. संवाद सुरू असताना आरोपीनं महिला बनून आमदाराकडे एक मदत मागितली. महिला समजून आमदारानं देखील मदतीचं आश्वासन दिलं.

हेही वाचा-'ती' बोलत नाही म्हणून भेटायला बोलावलं, वाद झाला अन् झाडली गोळी, पण....

काही वेळानं आमदारांना एका महिलेचा व्हिडीओ कॉल आला. ज्यामध्ये समोरील महिलेनं मदतीबाबत आमदाराशी चर्चा केली. हा व्हिडीओ कॉल कट झाल्यानंतर काही वेळातच आरोपीनं आमदाराला एक अश्लील व्हिडीओ पाठवला. हा अश्लील व्हिडीओ आमदाराचा होता. संबंधित व्हिडीओ एडिट करण्यात आल्याचा दावा फिर्यादी आमदारानं केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीनं आमदाराकडे पाच हजार रुपयांची खंडणी मागितली.

हेही वाचा-अंगावरील हळद उतरण्याआधीच पुसलं कुंकू; लग्नाच्या तिसऱ्या दिवशी नवरदेवानं दिला जीव

समाजात बदनामी होण्याच्या भितीने आमदाराने आरोपीला फोन पे द्वारे 5 हजार रुपये पाठवले. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने दुसऱ्या दिवशी परत 11 हजार रुपयांची मागणी केली. आपली फसवणूक होतं असल्याचं लक्षात आल्यानंतर, संबंधित आमदारानं पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत, पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत राजस्थानातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीनं अशाप्रकारे अनेकांची फसवणूक केली असल्याचा संशय पोलिसांना आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Mumbai