Home /News /mumbai /

काल वर्षावरील बैठकीत अन् आज थेट गुवाहाटीत; दिलीप लांडे यांचा बंडखोरांसोबतचा VIDEO समोर

काल वर्षावरील बैठकीत अन् आज थेट गुवाहाटीत; दिलीप लांडे यांचा बंडखोरांसोबतचा VIDEO समोर

काल दिलीप लांडे वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीला हजर होते आणि शिवसेनेची साथ सोडणार नाही असं ते सांगत होते. मात्र आता ते शिंदे गटाकडे पोहोचल्याने शिवसेनेसाठी हा मोठा धक्का आहे.

    मुंबई 24 जून : आमदार दिलीप लांडे (Shivsena Dilip Lande) गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. काल ते सेनेच्या बैठकीला हजर होते. आज मात्र ते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. रेडिसन ब्लूमध्ये जातानाचा त्यांचा व्हिडिओ (Dilip Lande Video) समोर आला आहे. आतमध्ये जाताच आमदारांनी हस्तांदोलन करत त्यांचं स्वागत केल्याचं पाहायला मिळतं. दिलीप लांडे यांच्या प्रवेशानंतर आता शिवसेनेचे एकूण 38 आमदार शिंदे गटात सामील झाले आहेत. काल दिलीप लांडे वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीला हजर होते आणि शिवसेनेची साथ सोडणार नाही असं ते सांगत होते. मात्र आता ते शिंदे गटाकडे पोहोचल्याने शिवसेनेसाठी हा मोठा धक्का आहे. दिलीप लांडे (Dilip Lande) यांच्याशी बराच वेळ संपर्क करण्याचा प्रयत्न झाला परंतु त्यांचा फोन लागत नसल्याने लांडे नेमके गेले कुठे हा प्रश्न उपस्थित केला जात होता. अशात आता दिलीप लांडे गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. बंडखोर आमदारांसोबतचा त्यांचा व्हिडिओ समोर आला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena

    पुढील बातम्या