मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'शिवसेना स्टाइल'ने सोमय्यांना दिवाळीनंतर उत्तर देऊ, मंत्र्याने दिला थेट इशारा

'शिवसेना स्टाइल'ने सोमय्यांना दिवाळीनंतर उत्तर देऊ, मंत्र्याने दिला थेट इशारा

'किरीट सोमय्या यांना दररोज आरोप करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.  बिनबुडाचे आरोप करायचे आणि नाहक बदनामी करायची एवढीच त्यांची कामगिरी आहे'

'किरीट सोमय्या यांना दररोज आरोप करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. बिनबुडाचे आरोप करायचे आणि नाहक बदनामी करायची एवढीच त्यांची कामगिरी आहे'

'किरीट सोमय्या यांना दररोज आरोप करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. बिनबुडाचे आरोप करायचे आणि नाहक बदनामी करायची एवढीच त्यांची कामगिरी आहे'

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 13 नोव्हेंबर : अन्वय नाईक आत्महत्या (Anvay Naik suicide case) प्रकरणावर भाजप (BJP) विरुद्ध शिवसेना (Shivsena) असा सामना रंगला आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी एकापाठोपाठ एक गंभीर आरोप ठाकरे कुटुंबावर केले आहे. ' सोमय्यांच्या आरोपांची मालिका संपू द्या. आम्ही सगळी चिरफाड करून शिवसेना स्टाईलने एकदाच आरोपांची उत्तरं देऊ, आम्ही करणाऱ्या आरोपांसाठीही त्यांनी तयार राहावं.' असा इशारा शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिला.

'किरीट सोमय्या यांना दररोज आरोप करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.  बिनबुडाचे आरोप करायचे आणि नाहक बदनामी करायची एवढीच त्यांची कामगिरी आहे. पण, त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर त्यांच्या कोणत्याही आरोपात काहीही तथ्य आढळले नाही', असा टोला अनिल परब यांनी लगावला.

'आता त्यांना काय आरोप करायचे आहे, ते आरोप करू द्या, आम्ही सगळी चिरफाड करून शिवसेना स्टाईलने एकदाच आरोपांची उत्तरं देऊ. मात्र त्यानंतर आम्ही करणाऱ्या आरोपांसाठीही त्यांनी तयार राहावं', असा इशाराही परब यांनी दिला.

मुळात सोमय्या हे बिनबुडाचे आरोप करत आहे. त्यांच्या कोणत्याही आरोपात तथ्य नाही. या आरोपांना आधीच उत्तर दिले आहे. आता सध्या दिवाळीचे दिवस आहे. दोनचार दिवस जावू द्या, दिवाळीनंतर एकदाच काय ते उत्तर देऊन टाकू, असंही परब म्हणाले.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 'या' नंबरवर मेसेज करा आणि मिळवा योजनांची माहिती

दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर सडकून टीका केली आहे. 'एका महिलेचं कुंकू पुसलं गेलं. अक्षता नाईक आणि त्यांची मुलगी गेल्या अनेक वर्षांपासून आक्रोश करत आहे. शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते काही बोलायला तयार नाही. आम्ही जेव्हा त्या अबलेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहोत तेव्हा या प्रकरणाचा तपास भरकटून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. तपासाची दिशा बदलून टाकण्यासाठी शेटजींच्या पक्षाचे नेते तेव्हा हे अत्यंत फालतू असे मुद्दे घेऊन समोर येत आहे' अशी टीका राऊत यांनी केली.

तसंच, 'म्हणे, 21 व्यवहार केले आहे. ते दाखवावे, हा खोटारडेपणाचा कळस आहे. एक लक्षात घ्या, त्यांनाही वॉर्निंग आहे. हे सरकार पाच वर्ष पूर्ण करणार आहे' असा इशाराही राऊत यांनी दिला.

सोमय्यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार

तर दुसरीकडे, आज पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

'या सरकारच्या वर्षपूर्तीआधी आणखी तीन घोटाळे बाहेर काढणार आहे. याचा तपास लोकायुक्तांनी करावा असे निर्देश राज्यपालांनी दिले आहेत.  यावर संजय राऊत आणि शिवसेना नेते का बोलत नाहीत. धमकी देण्याची भाषा संजय राऊतांची आहे. आम्ही त्या भाषेत बोलणार नाहीत.  राऊतांमध्ये हिंमत असेल तर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करावी,  ही माझी वॉर्निंग आहे. हिंमत असेल तर त्यांनी माझ्यावर कारवाई करुन दाखवावी, असा पलटवार सोमय्यांनी केला आहे.

भाजप सोडणार का? अखेर मेधा कुलकर्णी यांनी दिले उत्तर

'30 सातबाऱ्यांवर अन्वय नाईक परिवार आणि रश्मी ठाकरे यांचे एकत्रित नाव आहे. मुळ मुद्दे भरकवटण्याचा प्रयत्न केले जात आहे.  नाईक, वायकर आणि ठाकरे परिवारात काय आर्थिक लागेबांधे काय आहेत?  उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आर्थिक व्यवहार केले आहेत, त्याची उत्तरं द्यावीत, असंही सोमय्या म्हणाले.

First published: