निधीवाटपाबाबत कोणावरही अन्याय करणार नाही, मुख्यमंत्र्यांचं सेनेच्या आमदारांना आश्वासन

निधीवाटपाबाबत कोणावरही अन्याय करणार नाही, मुख्यमंत्र्यांचं सेनेच्या आमदारांना आश्वासन

निधीवाटपाबाबत कोणावरही अन्याय करणार नाही, मुख्यमंत्र्यांनी सेना आमदारांना आश्वासन दिल्याचं रामदास कदम यांचं वक्तव्य.

  • Share this:

 

31 मार्च : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर शिवसेनेच्या नेत्यांची नाराजी दूर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आज ठोस आश्वासन दिलं असून निधी वाटपाबद्दल कोणावरही अन्याय करणार नाही, असं अश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिवसेना आमदारांना दिलं आहे. हे सरकार शिवसेना आणि भाजपचं सरकार आहे. त्यामुळे यापुढे शिवसेना-भाजपच्या आमदारांना समान नीधी वाटप केलं जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

यापूर्वी भाजपच्या आमदारांना जास्त आणि शिवसेनेच्या आमदारांना विकास कामांसाठी कमी निधी दिला जात होता. यासंदर्भात, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर काल सेनेच्या मंत्र्यांची मातोश्रीवर बैठक झाली होती. या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी, भाजपला निर्वाणीचा इशारा दिला होता. त्यानंतर शिवसेनेच्या नाराज मंत्र्यांची आज सकाळी वर्षा बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेची नाराजी दूर केल्याचं समाजतय.

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर पूर्ण विश्वास असून अर्थसंकल्पात जी नाराजी होती तीही आता दूर झाली असल्याचं शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी म्हटंल आहे. शेतकर्यांची कर्जमुक्ति हा आमचा प्रथम क्रमांकाचा विषय आहे. शिवसेना आजही कर्जमुक्तीसाठी आग्रही आहे. जो पर्यंत कर्जमुक्ति होत नाही, तोपर्यंत कर्जमुक्तीसाठी शिवसेनेचा लढा सुरू राहील. मुख्यमंत्र्यांनी कर्जमुक्तिच्या मागणीवर सभागृहात लेखी आणि तोंडी आश्वासन दिलेलं आहे, असं सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांची बाजू मांडली आहे.

याशिवाय, शिवसेना आमदारांच्या विकास निधी संदर्भात समतोल साधला जाईल. ज्या मतदारांनी निवडूण दिलं आहे, त्यांची विकास कामं करणं ही माफक अपेक्षा आहे. त्यासाठीच आमची ही प्रमुख मागणी होती. मुख्यमंत्र्यांनी समाधान कारक उत्तर दिली आहेत. त्याचबरोबर, शिवसेनेच्या कुठल्याच आमदाराची नाराजी रहाणार नाही याची मी काळजी घेईन, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं असल्याचं शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2017 12:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...