मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

‘नारायण राणे वैफल्यग्रस्त, त्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही’

‘नारायण राणे वैफल्यग्रस्त, त्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही’

विरोधक निराश आहेत, सरकारने वर्षभर चांगलं काम केलं आहे. फक्त विरोध करण्याशिवाय विरोधकांना 5 वर्ष काहीही काम असणार नाही.

विरोधक निराश आहेत, सरकारने वर्षभर चांगलं काम केलं आहे. फक्त विरोध करण्याशिवाय विरोधकांना 5 वर्ष काहीही काम असणार नाही.

विरोधक निराश आहेत, सरकारने वर्षभर चांगलं काम केलं आहे. फक्त विरोध करण्याशिवाय विरोधकांना 5 वर्ष काहीही काम असणार नाही.

  • Published by:  Ajay Kautikwar

मुंबई 30 नोव्हेंबर:  नारायण राणे (Narayan Rane) राज्यातल्या महाविकास आघाडीवर सध्या आक्रमकपणे टीका करत आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज राणे यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना प्रत्युत्तर दिलं. नारायण राणेंकडून प्रमाणपत्र घेण्याची वेळ आमच्यावर आलेली नाही. ते वैफल्यग्रस्तं झालेले आहेत. विरोधक निराश आहेत, सरकारने वर्षभर चांगलं काम केलं आहे असं परब यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार 5 वर्ष सरकार टिकणार आहे. फक्त विरोध करण्याशिवाय विरोधकांना 5 वर्ष काहीही काम असणार नाही असंही त्यांनी सांगितलं.

परब पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना सरकारनं सुरुवातीलाच कर्ज माफी दिली आहे. कोरोनात जगाची दैना झाली आहे. कधी कधी कर्ज काढावं लागत, राज्याची पत आहे म्हणून कर्ज मिळातं असंही ते म्हणाले. मेट्रोकार शेडच्या जमिनीबाबत आम्ही अभ्यास करूनच निर्णय घेतला आहे. त्यासाठी सर्व तयारी झाली असून कुठलीही अडचण येणार नाही असंही त्यांनी सांगितलं.

मराठा आरक्षण टिकावं यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत, त्यावर चर्चा सुरू आहे, हा विषय कोर्टात असून सरकार पूर्ण ताकदीने बाजू मांडत आहे. कोणत्याही जातीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मोदी सरकारचा नवा प्लॅन; या नियमांचं पालन न केल्यास रद्द होईल गाडीचं रजिस्ट्रेशन

सध्या उर्मिला मातोंडकरांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू आहे. त्याबद्दल बोलताना परब म्हणाले, त्यांचा शिवसेना प्रवेश हा मंगळवारी होण्याची शक्यता आहे. त्यांचं नाव विधान परिषदेसाठी पाठवलेलं आहे. राज्यापालांना पाठवलेली सर्व नावे ही कॅबिनेटची मान्यता घेऊन नाव पाठवलेली आहेत आणि निर्णयाची वाट पाहत आहोत असंही त्यांनी सांगितलं.

विधिमंडळाच्या अधिवेशनाबाबत 4 डिसेंबरला सल्लागार समितीची बैठक आहे. परिस्थितीचा आढवा घेऊन  त्यात निर्णय होईल अशी माहितीही त्यांनी दिली.

First published:

Tags: Narayan rane