Home /News /mumbai /

....आणि आदित्य ठाकरेंनी मोफत लसीकरणाचे ट्वीट केले डिलीट!

....आणि आदित्य ठाकरेंनी मोफत लसीकरणाचे ट्वीट केले डिलीट!

आदित्य ठाकरे यांनी राज्यातील सर्व नागरिकांना मोफत लस दिली जाईल, अशी घोषणाच करून टाकली होती पण...

    मुंबई, 25 एप्रिल : राज्यात कोरोनाने (Corona) हाहाकार माजवला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात आला आहे. अनेक राज्यांनी मोफत लसीकरण (corona vaccine) करण्याची घोषणा केली आहे. शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी सुद्धा राज्यात कोरोनाची लस मोफत दिली जाणार अशीच घोषणाच करून टाकली होती. पण, काही वेळांनी त्यांनी हे ट्वीट डिलीट केले आहे. बिहार, आंध्र प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मोफत लसीकरणाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार कधी मोफत लसीकरणाची घोषणा करणार असा प्रश्न विचारला जात असताना आदित्य ठाकरे यांनी राज्यातील सर्व नागरिकांना मोफत लस दिली जाईल, अशी घोषणाच करून टाकली. पण, काही वेळांनी आदित्य ठाकरे यांनी मोफत लसीकरण केल्याचे ट्वीट डिलीट केले. 'राज्य सरकारकडून मोफत लसीकरण करण्याबाबत विचार सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अधिकृत लसीकरण धोरणाबाबत गोंधळ होऊ नये म्हणून मी पूर्वीचे ट्विट हटवले आहे' असा खुलासा आदित्य ठाकरेंना करावा लागला. तसंच. 'लसीकरणाचे अधिकृत धोरण समितीद्वारे घोषित केले जाईल आणि समाजातील सर्व घटकांसाठी योग्य धोरणाच्या शिफारशीची आपण प्रतीक्षा केली पाहिजे. झालेल्या गोंधळासाठी मी दिलगीर व्यक्त करतो, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. अंकिता लोखंडे करणार विवेक ओबेरॉयसोबत रोमान्स; केली नव्या चित्रपटाची घोषणा दरम्यान,दरम्यान, देशभरात वाढत्या रुग्णसंख्येदरम्यान येत्या 1 मेपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होत आहे. तिसऱ्या टप्प्यात 18 वर्षाहून अधिक वय असणाऱ्या सर्वांना लस दिली जाणार आहे. केंद्रानं याआधीच स्पष्ट सांगितलं आहे की, 18 ते 45 या वयोगटातील लोकांनी सरकार व्हॅक्सिन पुरवणार नाही. ही लस त्यांना स्वतःच खरेदी करावी लागेल किंवा मग राज्यांना ही लस विकत घ्यावी लागेल.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Aaditya thackeray, Shivsena

    पुढील बातम्या