मुंबई, 25 सप्टेंबर : राहिले ते कावळे आणि उडाले ते मावळे या शिवसेनाप्रमुखांच्या शिकवणीचा पक्षाला विसर पडल्याचं दिसतंय. निमित्त ठरलंय ते नारायण राणेंच्या संभावित भाजप प्रवेशाचं.राणे भाजपमध्ये जाणार या शक्यतेनं शिवसैनिक अस्वस्थ झालेत. त्यांनी भर चौकात पोस्टर लावून राणेंबद्दल असभ्य शेरेबाजी केलीय.
शिवसेना विरूद्ध नारायण राणे असा वाद आता पुन्हा नव्याने पेटणार असल्याचं दिसतंय. आज शिवसेना मुंबईतल्या वरळी नाक्यावर नारायण राणेंवर टीका करणारं वादग्रस्त आणि तितकंच आक्षेपार्ह असं होर्डिंग लावलंय. या होर्डिंगवरून पुन्हा एकदा राजकीय होर्डिंग वाॅर सुरू होणार असल्याचंही दिसतंय.
नारायण राणेंबद्दलचा राग शिवसैनिक मिळेल तसा व्यक्त करत असतात. आता नारायण राणे भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा आहे. यामुळे शिवसेना अस्वस्थ झालीय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा