News18 Lokmat

मलिष्काचं गाणं शिवसेनेला झोंबलं, गाण्यातूनच दिलं प्रत्युत्तर

मलिष्कावर टीका करणारं गाणं शिवसेनेनं तयार केलेय. मलिष्काला बालिश म्हणायलाही शिवसैनिक विसरले नाहीत.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 14, 2017 11:14 AM IST

मलिष्काचं गाणं शिवसेनेला झोंबलं, गाण्यातूनच दिलं प्रत्युत्तर

14 जुलै : मलिष्काचं गाणं अख्ख्या मुंबईला आवडलं असलं तरी शिवसेनेला मात्र ते झोंबलेलं दिसतंय. कारण मलिष्कावर टीका  करणारं गाणं शिवसेनेनं तयार केलेय. मलिष्काला बालिश म्हणायलाही शिवसैनिक विसरले नाहीत.

सेनेचं गाणं हे असं आहे

'मुंबईकरांना बीएमसीवर भरोसा हाय.

पण तुला बीएमसीवर भरोसा नाय काय?

..

Loading...

केंद्र सरकार चालवत असलेल्या रेल्वे शेड्युल मध्ये झोल झोल,

त्यावर तू म्हणते बीएमसीची झालीय पोल खोल.

रेल्वे आणि बीएमसीचा संबंध काय ते लवकर बोल, बोल,

आर जे तुला मुंबईची बदनामी करण्याचे कारण काय काय?

मुंबईकरांना बीएमसीवर भरोसा हाय.

पण तुला बीएमसीवर भरोसा नाय काय?

..

मुंबईच्या रस्त्यावर ट्राफिक लांब लांब, वाहतूक खात्याने लावलेले सिग्नल गोल गोल,

त्यावर तू म्हणते बीएमसीची झालीय पोल खोल.

वाहतूक खात्याचा आणि बीएमसीचा संबंध काय ते लवकर बोल, बोल

आर जे तुला मुंबईची बदनामी करण्याचे कारण काय काय?

मुंबईकरांना बीएमसीवर भरोसा हाय.

पण तुला बीएमसीवर भरोसा नाय काय?

...

तुझा मेंदू आहे गोल गोल, तुझ्या मेंदूत असा कसा झोल झोल,

तुला पैसे घेऊन बोलायचे आहे तेवढे  बोल बोल..

आर जे तुला मुंबईची बदनामी करण्याचे कारण काय काय?

मुंबईकरांना बीएमसीवर भरोसा हाय.

पण तुला बीएमसीवर भरोसा नाय काय?'

ही व्हाट्स अप पोस्ट सध्या वायरल होतेय. खरंतर मलिष्कानं तिच्या गाण्यात सेनेचा उल्लेखही केलेला नाही. पण तरीही शिवसेना मात्र मलिष्कावर टीका करतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 14, 2017 11:14 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...