अमित शहा-उद्धव ठाकरे भेटीपूर्वी मातोश्रीवर खलबतं

अमित शहा-उद्धव ठाकरे भेटीपूर्वी मातोश्रीवर खलबतं

त्याआधी शिवसेनेचे काही नेते शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेणार आहेत. त्यांच्या सोबत होणाऱ्या बैठकीत अमित शहा यांच्या सोबत बैठकीबाबत देखील चर्चा होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 06 जून : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीपूर्वी मातोश्रीवर  चर्चांची खलबतं होणार, असं सूत्रांकडून कळलंय. अमित शहा आज संध्याकाळी ७ वाजता मातोश्रीवर येणार आहेत. त्याआधी शिवसेनेचे काही नेते शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेणार आहेत. त्यांच्या सोबत होणाऱ्या बैठकीत अमित शहा यांच्या सोबत बैठकीबाबत देखील चर्चा होणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्या सोबत होणाऱ्या बैठकीसंदर्भात फारशी कोणाशीही चर्चा केलेली नाहीये. अमित शहा यांच्याकडूनही बैठक कोणत्या विषयावर आहे, या संदर्भात खुलासा केलेला नाहीये. त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये काय चर्चा होतेय याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय. मात्र त्याआधी मातोश्रीवर राजकीय खलबतं सुरू झालीत.

याआधी १८ जून २०१७ रोजी झालेल्या बैठकीत अमित शहा यांच्या सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे देखील उपस्थित होते. मात्र मुख्य बैठक जी मातोश्रीच्या पहिल्या मजल्यावर झाली होती. या बैठकीत फक्त उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. याच बैठकीत काही वेळ उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांची एकांतात चर्चा ही झाली होती. मात्र त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पहिल्या मजल्यावरील बैठकीपासून दूर ठेवलं होतं. कारण रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना 'साला' म्हणून वाद ओढून घेतला होता.

आज होणाऱ्यया बैठकीत अमित शहा यांच्या सोबत देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे आणि विनोद तावडे हे देखील उपस्थित रहाणार आहेत. यावेळी मागच्या बैठकीप्रमाणेच मानापमान नाट्य होणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 6, 2018 11:36 AM IST

ताज्या बातम्या