Home /News /mumbai /

यशवंत जाधवांची कोट्यवधींची संपत्ती IT कडून जप्त; पाच कोटींच्या फ्लॅटसह 40 मालमत्तेवर टाच

यशवंत जाधवांची कोट्यवधींची संपत्ती IT कडून जप्त; पाच कोटींच्या फ्लॅटसह 40 मालमत्तेवर टाच

मुंबई महापालिकेच्या (Bombay Municipal Corporation) स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव (Shiv Sena leader Yashwant Jadhav) यांच्याभोवती कारवाईचा फास आणखी आवळला आहे.

    मुंबई, 08 एप्रिल: मुंबई महापालिकेच्या (Bombay Municipal Corporation) स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव (Shiv Sena leader Yashwant Jadhav) यांच्याभोवती कारवाईचा फास आणखी आवळताना दिसत आहे. यशवंत जाधव यांना मोठा झटका बसला आहे. जाधव यांच्या 41 मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात जप्त करण्यात आल्या आहेत. आयकर विभागाकडून (Income Tax) या मालमत्तेवर टाच आली आहे. यामध्ये यशवंत जाधव यांचा वांद्रयातील पाच कोटींचा फ्लॅट आहे. 25 फेब्रुवारीला आयकर विभागानं माजगाव येथील त्यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता. तेव्हापासून सुरु असलेल्या या तपाासदरम्यान यशवंत जाधव यांच्या अनेक संपत्तींवर टाच आणण्यात आली आहे. या संपत्तीवर टाच आज यशवंत जाधव यांचे भायखळ्यातल्या बिलखाडी चेम्बर्स या इमारतीतील 31 फ्लॅट्स आणि वांद्रेतील 5 कोटींचा फ्लॅट आयकर खात्याकडून जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आले आहेत त्यापैकी 26 फ्लॅट Newshawk Multimedia Pvt Ltd कंपनीच्या नावे नोंद आहेत. Newshawk Multimedia Pvt Ltd. कंपनीच्या नावे या भाडेकरुंना थेट रोख रक्कम देण्यात आली होती. याशिवाय भायखळामधील इम्पिरियल क्राउन हॉटेल आहे जे यशवंत जाधव यांनी आपल्या सासूच्या नावे खरेदी केलं होतं. वांद्रे येथील फ्लॅट आणि याशिवाय यशवंत जाधव प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे हाताळणाऱ्या 14 संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. यशवंत जाधव यांच्या मालकीच्या काही मालमत्ता नातेवाईकांच्या माध्यमातून चालवल्या जात होत्या, त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. यशवंत यांचे पुतणे विनित जाधव आणि मेहुणे मोहिते यांनाही समन्स पाठवण्यात आल्याची माहिती आहे. Playboy होण्याच्या नादात पुण्यातल्या तरुणाचा Game Over, गमावले तब्बल 17 लाख यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप जानेवारी महिन्यातच भाजप नेते किरीट सोमय्यांकडून करण्यात आला होता. एवढंच काय तर मुंबईतील कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. यात मनी लॉन्ड्रिंग केल्याचाही गंभीर आरोप सोमय्यांनी जाधवांवर केला होता.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: BMC, Income tax, Shiv sena

    पुढील बातम्या