Home /News /mumbai /

बंड विरुद्ध संघर्ष; उद्धव ठाकरेंच्या शेवटच्या डावानंतर संजय राऊतांचं ते ट्विट व्हायरल!

बंड विरुद्ध संघर्ष; उद्धव ठाकरेंच्या शेवटच्या डावानंतर संजय राऊतांचं ते ट्विट व्हायरल!

काय आहे संजय राऊतांचं ते ट्विट...

    मुंबई, 22 जून : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर आज पहिल्यांदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी ठाकरेंनी जनतेशी भावनिक साद घातली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, समोर येऊन माझ्याशी संवाद साधा. आज मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करून ठेवतो. संध्याकाळी बंडखोरी केलेल्या आमदारांनी यावं. मला खुर्चीचा कोणताही मोह नाही. मी ओढून ताणून खुर्चीवर बसणार नाही. मुख्यमंत्रिपद हे माझ्याकडे  अनपेक्षितपणानं आलं. तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको हे माझ्यासमोर येऊन सांगा. मी पद सोडून देईन. हे माझं नाटक नाही. असं म्हणत भावनिक साद घातली. आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र प्रत्यक्षात ठाकरेंनी वेगळाच डाव खेळला. त्यांनी बंडखोर आमदारांना भावनिक साद घातली. मी मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहे असंही सांगितलं. यादरम्यान शिवसेनेचे खासदा संजय राऊन यांनी एक ट्विट केलं आहे. ते ट्विट (sanjay raut tweet) बरंच सूचक असल्याचं दिसत आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ठाकरे सरकार पायउतार होणार अशी चर्चा असताना संजय राऊतांनी संघर्ष करणार असं ट्विट केलं आहे. त्यामुळे अजूनही ठाकरे सरकारने माघार घेतली नसून संघर्ष करण्याच्या तयारीत असल्याचं सूचित होत आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Eknath Shinde, Sanjay raut, Shivsena, Uddhav thackarey

    पुढील बातम्या