मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

राऊतांनी नारायण राणेंना पुन्हा काढला चिमटा; नाव न घेता Meme मधून ठेवलं वर्मावर बोट

राऊतांनी नारायण राणेंना पुन्हा काढला चिमटा; नाव न घेता Meme मधून ठेवलं वर्मावर बोट

संजय राऊत यांनी नारायण राणे यांना पुन्हा चिमटा काढला आहे.

संजय राऊत यांनी नारायण राणे यांना पुन्हा चिमटा काढला आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नारायण राणे (Narayan Rane) यांना पुन्हा चिमटा काढला आहे. नारायण राणे यांचं नाव न घेता, त्यांनी बरोबर वर्मावर बोट ठेवलं आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 25 ऑगस्ट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) चांगलेच अडचणीत सापडले आहेत. काल नाशिक पोलिसांकडून त्यांना अटक झाल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षानं एकमेकांवर चांगलीच चिखलफेक केली आहे. त्यानंतर शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी मुंबईत बॅनरबाजी करत नारायण राणे यांना टार्गेट केलं होतं.

नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर बऱ्याच नाट्यमय घटना घडल्या आहेत. रात्री उशीरा नारायण राणे यांना जामीन देण्यात आला आहे. पण राणे यांना जामीन मिळाल्यानंतर हे प्रकरण शांत होईल, अशी अपेक्षा सर्वांना होती. पण संजय राऊत यांनी नारायण राणे यांना पुन्हा चिमटा काढला आहे. नारायण राणे यांचं नाव न घेता, त्यांनी बरोबर वर्मावर बोट ठेवलं आहे.

हेही वाचा-...त्यामुळे फडणवीसांनी राणेंना त्यांची जागा दाखवली, शिवसेनेच्या नेत्याची कोपरखळी

संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक मीम शेअर करत नारायण राणे (sanjay raut shared meme on narayan rane) यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी वाघाच्या तोंडात कोंबडी असल्याचा फोटो शेअर करत 'आजचा दिवस थोडक्यात' असं ट्वीट केलं आहे. त्याचं हे ट्वीट अवघ्या काही मिनिटांत व्हायरल झालं आहे. यावर अनेकजण खोचक प्रतिक्रियाही देत आहेत.

हेही वाचा-नारायण राणेंच्या अटकेचा आदेश कोणाचा? वाचा अटकेमागची STORY

राणेंनी मानले सहकाऱ्यांचे आभार

दरम्यान नारायण राणे यांनी ट्वीट करत कालच्या घटनेत पाठीशी उभं राहणाऱ्या कार्यकर्त्याचं आणि नागरिकांचं आभार मानलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, कालच्या प्रसंगामध्ये माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे माझ्या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व माझ्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार, असं राणे यांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Maharashtra, Narayan rane, Sanjay raut