Home /News /mumbai /

राज्यपालांचे आदेश राफेलपेक्षा जास्त वेगाने, त्यांच्यावरही कदाचित दबाव असेल; संजय राऊतांचा टोला

राज्यपालांचे आदेश राफेलपेक्षा जास्त वेगाने, त्यांच्यावरही कदाचित दबाव असेल; संजय राऊतांचा टोला

विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी असंवैधनिक असून याबाबत आम्ही सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहेत, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

    मुंबई, 29 जून : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांनी राफेल विमानापेक्षा जास्त वेगाने आदेश दिले आहे. मात्र आम्ही समजू शकतो त्यांच्यावरही कदाचित दबाव असेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं. राज्यपालांकडे 12 आमदारांच्या नियुक्तीचं पत्र मागील गेल्या अडीच वर्षापासून पडून आहे. त्यावर अद्याप निर्णय होत नाही. मात्र बहुमत सिद्ध करण्याबाबत राज्यपालांनी प्रचंड वेगाने आदेश दिले. राज्यपालांचा वेग आश्चर्यकारक आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं. भाजप घटनाविरोधी काम करत आहे. सरकार डळमळीत होण्याची भाजप वाट पाहत होतं. त्यांच्या स्वप्नपूर्तीचा क्षण जवळ येत असल्याचं त्यांना वाटत आहे. मात्र हे इतसं सहज आणि सोपं नाही, असंही संजय राऊत यांनी सांगितलं. विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी असंवैधनिक असून याबाबत आम्ही सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहेत, असंही संजय राऊत यांनी सांगितलं. ठाकरे सरकारचा उद्या फैसला, वाचा राज्यपालांच्या पत्रातील 7 महत्त्वाचे मुद्दे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे सकारनं बहुमत गमावलं असं मानलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. उद्या (गुरूवारी) बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारला दिले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारसाठी गुरूवारचा दिवस निर्णायक ठरणार आहे. Maharshtra Political Crises: उद्याची बहुमत चाचणी कुणाच्या अध्यक्षतेखाली होणार? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपच्या (BJP) प्रमुख नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची मंगळवारी भेट घेतली. या भेटीमध्ये भाजपने महाविकासआघाडी सरकार अल्पमतात असून लवकरात लवकर बहुमत चाचणी घ्यावी, अशी मागणी केली. त्यानंतर राज्यपालांनी हे पत्र लिहलं आहे. राज्यपालांच्या या पत्रानंतर आता उद्धव ठाकरे सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागेल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Eknath Shinde, Sanjay raut, Shivsena

    पुढील बातम्या