Home /News /mumbai /

सोमय्यांच्या संस्थेला 172 कंपन्यांकडून संशयास्पद देणग्या; आता ईडी चौकशी करणार का? संजय राऊतांचा सवाल

सोमय्यांच्या संस्थेला 172 कंपन्यांकडून संशयास्पद देणग्या; आता ईडी चौकशी करणार का? संजय राऊतांचा सवाल

किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला 172 कंपन्यांकडून संशयास्पद देणग्या देण्यात आला, असा गंभीर आरोप शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (Sanjay Raut PC) यावेळी राऊत यांनी पुन्हा सोमय्यांवर निशाणा साधला. (Sanjay Raut Criticized Kirit Somaiya)

पुढे वाचा ...
    मुंबई, 10 मे : शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर (BJP leader Kirit Somaiya) हल्लाबोल केला आहे. किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला 172 कंपन्यांकडून संशयास्पद देणग्या देण्यात आल्या, असा गंभीर आरोप शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (Sanjay Raut PC) यावेळी राऊत यांनी पुन्हा सोमय्यांवर निशाणा साधला. (Sanjay Raut Criticized Kirit Somaiya) काय म्हणाले संजय राऊत - भाजप नेते किरीट सोमय्या हे कंपन्यांकडून खंडणीच्या स्वरुपात पैसे मिळवतात. तसेच सोमय्यांनी 150 हून अधिक व्यापारी, बिल्डर यांच्याकडून तपास संस्थांचा धाक दाखवून निधी गोळा केला आहे. आपल्याकडे अशा 172 कंपन्यांची नावे आहेत, ज्यांनी खंडणीस्वरुपात किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला निधी दिला. तसेच येणाऱ्या काळात हळूहळू आपण सोमय्यांची सर्व प्रकरणे बाहेर काढू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. तर कालच किरीट सोमय्यांनी संजय राऊतांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात अब्रुनूकसानीची तक्रार दाखल केली आहे. बिनबुडाचे आरोप करून राऊत आपल्या कुटुंबाची बदनामी करत असल्याचे सोमय्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यावर आज संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. येत्या काळात विक्रांत घोटाळा (INS Vikrant Case) आणि टॉयलेट घोटाळ्यापेक्षाही मोठे घोटाळे उघड होतील, असे काल संजय राऊत म्हणाले होते. यानंतर आज पुन्हा त्यांनी किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला. राऊत यांचा गौप्यस्फोट - सोमय्यांच्या संस्थेला कोलकातामधील मेट्रो डायरी या कंपनीकडून लाखोंचा निधी देण्यात आला आहे. भ्रष्टाचाराप्रकरणी या कंपनीची सीबीआय व ईडीकडून सध्या चौकशी सुरू आहे. त्याच कंपनीकडून सोमय्यांना लाखोंचा निधी देण्यात आला. सोमय्या नेहमी इतरांच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलतात. मग भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या कंपनीकडून त्यांनी निधी कसा घेतला. हा व्यवहार संशयास्पद आहे. त्यामुळे ईडीने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. किरीट सोमय्या हे भ्रष्टाचार प्रकरणाचे मुख्य सूत्रधार आहेत. त्यासोबतच आम्ही लवकरच विधानपरिषदेतील भाजपच्या आणखी दोन आमदारांचा भ्रष्टाचार बाहेर काढू, तुम्ही आमच्याकडे एक बोट दाखवत असताना तुमच्याकडे चार बोटे आहेत. जे स्वतः काचेच्या घरात राहतात, त्यांनी इतरांच्या घरावर दगड भिरकावू नयेत, असा इशाराही राऊतांनी सोमय्यांना दिला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Kirit Somaiya, Maharashtra politics, Sanjay raut

    पुढील बातम्या