शिवसेना नेत्या संतापल्या! म्हणाल्या, 'लव्ह जिहाद' हा भाजपचाच अजेंडा

शिवसेना नेत्या संतापल्या! म्हणाल्या, 'लव्ह जिहाद' हा भाजपचाच अजेंडा

लव्ह जिहाद कुठे झाला आहे हे आम्ही दाखवून देऊ. पण लग्न हा मुलगा-मुलीच्या पसंतीचा विषय आहे

  • Share this:

मुंबई, 21 नोव्हेंबर: राज्यात 'लव्ह जिहाद'च्या (Love Jihad) मुद्द्यावरून राजकारण तापलं असताना आता शिवसेना नेत्या आणि मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर ( Mumbai Mayer Kishori Pednekar) यांनी त्यात उडी घेतली आहे. 'लव्ह जिहाद' हा केवळ भाजपचा अजेंडा आहे. भाजप यामुद्द्यावरू केवळ शब्दांचा खेळ करत आहे. अशी टीका महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली.

लव्ह जिहाद कुठे झाला आहे हे आम्ही दाखवून देऊ. पण लग्न हा मुलगा-मुलीच्या पसंतीचा विषय आहे. मात्र, भाजप यावरून केवळ राजकारण करत आहे, असंही किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

हेही वाचा...मुंबईतील 'कराची स्वीट्स' मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस म्हणाले, एक दिवस...

महापौर किशोरी पेडणेकर यांनी शनिवारी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. आपल्या वक्तव्याबाबत त्या म्हणाल्या, मी केवळ धार्मिक स्थळं म्हटलं नाही, तर बियर बारमध्ये जाणाऱ्यांमुळेही मुंबईत कोरोना पसरला. मात्र, आपल्या वक्तव्याचा भाजपकडून विपर्यास करण्यात आला. कोरोनाबाबत लोक गंभीर नाहीत. मुंबईत दोन टक्के लोकांनी यावरुन राजकारण करण्याचा घाट घातल्याची टीका किशोरी पेडणेकर यांनी केली. बक्कळ, रग्गड अशी भाजपची भूमिका चुकीची आहे.

महापालिका निवडणुकीत आम्ही त्यांना (भाजपला) आमची ताकद काय आहे ते दाखवून देऊ, असं आव्हानही किशोरी पेडणेकर यांनी यावेळी केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संयमी नेतृत्त्वामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याचा दावा पेडणेकर यांनी केला. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 15 दिवसांसाठी लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द कराव्यात, अशी मागणीही किशोरी पेडणेकर यांनी यावेळी केली.

'लव्ह जिहाद'वर काय म्हणाले फडणवीस?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशात ‘लव्ह जिहाद’ च्या घटना घडत आहेत, त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी कायदा आणणे आवश्यक आहे. ते कॉंग्रेस नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या आरोपासंदर्भात एका प्रश्नाला उत्तर देत होते. गेहलोत यांनी भाजपवर लव्ह जिहाद हा शब्द तयार करण्याचा आणि जातीय सलोखा बिघडविण्याचा आरोप केला होता. यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणाले, 'हे सर्व ढोंगी धर्मनिरपेक्ष लोक आहेत. हिंदूंवर हल्ले करणे आणि त्यांना शिव्या देणे म्हणजे धर्मनिरपेक्षता, असे त्यांचे मत आहे.'

हेही वाचा...कोरोनाची लाट त्सुनामीसारखी पुन्हा येऊ शकते, शाळा सुरू होणार की नाही, उद्या बैठक

देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशात लव्ह जिहाद चालू आहे आणि केरळमध्येही भाजपाची सत्ता नसतानाही हे स्वीकारले गेले आहे. जेव्हा अशा गोष्टी उद्भवतात तेव्हा कायदे करणे ही सरकारची जबाबदारी बनते, काही भाजप शासित राज्यांनी तथाकथित लव्ह जिहाद रोखण्यासाठी योजना आखल्या आहेत, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

Published by: Sandip Parolekar
First published: November 21, 2020, 2:59 PM IST

ताज्या बातम्या