मलबार हिलला ‘रामनगरी’ नाव द्या, शिवसेना नेत्याचा प्रस्ताव

‘सीता मातेचं अपहरण झाल्यानंतर त्यांच्या शोधात भगवान राम आणि लक्ष्मण हे मलबार हिलमध्ये आले होते,’ असं दिलीप लांडे यांचं म्हणणं आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 7, 2018 03:19 PM IST

मलबार हिलला ‘रामनगरी’ नाव द्या, शिवसेना नेत्याचा प्रस्ताव

मुंबई, 7 डिसेंबर : मलबार हिल परिसराला 'रामनगरी' हे नाव द्या, अशी मागणी शिवसेना नेते आणि बीएमसी सुधार समितीचे अध्यक्ष दिलीप लांडे यांनी केली आहे. याबाबतचा प्रस्तावदेखील त्यांनी मुंबई महानगरपालिकेत ठेवला आहे.

‘राम आणि लक्ष्मण हे मलबार हिल परिसरात येऊन गेले असल्याचा उल्लेख मुंबई महानगरपालिकेच्या ग्रंथालयातील एका पुस्तकात आहे,’ असा दावाही दिलीप लांडे यांनी केला आहे. ‘सीता मातेचं अपहरण झाल्यानंतर त्यांच्या शोधात भगवान राम आणि लक्ष्मण हे मलबार हिलमध्ये आले होते,’ असं दिलीप लांडे यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, दिलीप लांडे यांच्या या प्रस्तावावर 13 सप्टेंबरला महानगरपालिकेत चर्चा होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे या परिसराचं खरंच नामांतर होतं का, हे पाहावं लागेल. मलबार हिल परिसरात अनेक महत्त्वाच्या व्यक्तींची निवासस्थाने आहेत. यामध्ये मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांचा समावेश आहे.

दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतराचीही मागणी

दादर रेल्वे स्टेशनच्या नामांतराचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. दादर रेल्वे स्टेशनला डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचं नाव द्या, अशी मागणी करत भीम आर्मी या संघटनेनं दादर स्टेशनवर पोस्टर्स चिकटवली. विशेष म्हणजे भीम आर्मीच्या या मागणीला बाबासाहेबांचे नातू आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी विरोध केला आहे.

Loading...

चैत्यभूमीत पुण्यतिथी निमित्त बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी लाखो भीमसैनिक दाखल झाले होते. अशातच भीम आर्मीनं दादर स्टेशनवर नामांतरासाठी आंदोलन केलं. आंदोलकांनी स्टेशनवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्थानक असे नामफलक चिकटवले होते.

प्रकाश आंबेडकरांचा मागणीला विरोध

महापरिनिर्वान दिनाच्या निमित्ताने भीम आर्मीने दादर स्टेशनच्या नामांतराचं आंदोलन केलं असलं तरीही प्रकाश आंबेडकर यांनीच त्याला विरोध दर्शवला आहे. मुंबईच्या सात बेटाचा ऐतिहासिक वारसा कायम राखला जावा, अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली आहे.

नेमका काय आहे दादर स्टेशनच्या नामांतराचा वाद?

-दादर स्टेशनच्या नामांतराची 25 वर्षांपासूनची मागणी

-नामांतरासाठी दलित संघटनांनी अनेकदा आंदोलनं केली

-2011 साली राष्ट्रवादीने नामांतराचा प्रस्तावही मांडला

-दादर स्टेशनला चैत्यभूमी असा होता नामांतराचा प्रस्ताव

-पण बाळासाहेब ठाकरेंनी नामांतरास केला होता विरोध

-विरोधामुळे नामांतराचा प्रस्ताव पुन्हा बारगळला

दरम्यान, देशात सध्या नामांतराचं खूपच वारं वाहत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नामांतराच्या मोहिमेत सर्वाधिक पुढे आहेत. इकडे महाराष्ट्रातही औरंगाबाद शहराचं संभाजीनगर असं नामांतर करण्यासाठीचा वाद जुनाच आहे. त्यातच आता मलबार हिल आणि दादर स्टेशनच्या नामांतर आंदोलनानेही पुन्हा नव्याने उचल खाल्ली असल्याचं चित्र आहे.


VIDEO: 'साताऱ्यात फक्त मीच चालतो'च्या डायलॉगवर उदयनराजेंचे कार्यकर्ते भडकले, निर्मात्याची गाडी फोडलीबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2018 02:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...