शिवसेनेच्या महिला उपशाखाप्रमुखांना मारहाण

शिवसेनेच्या महिला उपशाखाप्रमुखांना मारहाण

त्यांच्या डोक्यात फरशी टाकून त्यांना मारहाण करण्यात आली आहे

  • Share this:

भांडुप, 04 ऑक्टोबर: भांडूपमध्ये लवकरच पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर भांडूप शिवसेना उपप्रचारप्रमुख महिलेला मारहाण करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकारामागे भाजपचा हात असल्याचा आरोप सेनेने केला आहे.

शारदा जगदीशचन्द्र सरोज या शिवसेना उपप्रचारप्रमुखांना मारहाण  करण्यात आली आहे. त्यांच्या डोक्यात फरशी टाकून त्यांना मारहाण करण्यात आली आहे. त्यांना सायन हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं आहे. वार्ड क्रमांक 116 पोटनिवडणूकीच्या प्रचार संपून घरी गेल्यावर त्यांना मारहाण करण्यात आल्याचं कळतॆ आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 4, 2017 10:57 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...