मराठा स्त्री आणि मुख्यमंत्रिपद, आशिष शेलारांच्या वक्तव्यावर शिवसेनेनं दिली खोचक प्रतिक्रिया

मराठा स्त्री आणि मुख्यमंत्रिपद, आशिष शेलारांच्या वक्तव्यावर शिवसेनेनं दिली खोचक प्रतिक्रिया

या विधानावरून तर्क-वितर्क लावले जात असतानाच शिवसेनेनं मात्र खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 21 नोव्हेंबर : एका पुस्तक प्रकाशन समारंभात भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्याची राज्यात जोरदार चर्चा होत आहे. 'एखादी कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी अशी अपेक्षा बाळगणारा मोठा वर्ग मराठा समाजात आहे. तसं झालं तर माझ्यासारख्या माणसाचंही त्याला समर्थन असू शकतं,' असं शेलार यांनी म्हटलं. या विधानावरून तर्क-वितर्क लावले जात असतानाच शिवसेनेनं मात्र खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

'आशिष शेलारांनी मराठा महिला मुख्यमंत्री व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. ती भाजपची असावी की महाविकास आघाडीची असावी असं त्यांना वाटतं? महाविकास आघाडीची महिला मुख्यमंत्री आशिष शेलार ठरवणार आहेत का? आशिष शलारांनी जो दगड मारला आहे तो पोहचण्याआधीच त्याच्या ठिकऱ्या उडाल्या आहेत,' असं म्हणत शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यपाल नियुक्त आमदारांवर अजूनही शिक्कामोर्तब नाही...

'महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांकडे विनंती केली होती पुढील 15 दिवसांत मंजुरी मिळावी म्हणून. ही विनंती आहे हा काही कायदा नाही. या संदर्भात राज्यपालांनी कोणताही निर्णय घेतलेला दिसत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते एकत्र बैठक घेऊन लवकरच निर्णय घेतील,' अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

महापालिकेवरून भाजपवर हल्लाबोल

'महापालिका निवडणुकांना सव्वा वर्ष आहे. त्या संदर्भात पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील. शिवसेना निवडणुकीसाठी जन्माला आलेला पक्ष नाही. शिवसेनेचे काम नेहमीच सुरू असतं. निवडणुका असो अथवा नसो...शिवसेना पक्ष प्रमुख शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून नेहमीच माहिती घेत असतात. निवडणुका आल्या की छत्र्या उघडायच्या, असा पक्ष शिवसेना नाही. शिवसेनेचं काम 365 दिवस सुरूच असतं. शिवसेनेची तयारी नेहमीच असते. ज्यांनी स्वप्नं बघितली आहेत, त्यांचा स्वप्नंभंग झाला की आम्ही बोलूच,' असं म्हणत शिवसेनेच्या अनिल परब यांनी भाजपच्या 'मिशन मुंबई'वर घणाघात केला आहे.

Published by: Akshay Shitole
First published: November 21, 2020, 5:00 PM IST

ताज्या बातम्या