मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

महिला दिनाबद्दल बोलायला उभे राहिले आदित्य ठाकरे आणि फडणवीसांना लगावला टोला

महिला दिनाबद्दल बोलायला उभे राहिले आदित्य ठाकरे आणि फडणवीसांना लगावला टोला

आदित्य ठाकरे यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

आदित्य ठाकरे यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

आदित्य ठाकरे यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

मुंबई, 5 मार्च : महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत झालेल्या चर्चेवेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाषण केलं. या भाषणात त्यांनी महिलांचे प्रश्न आणि समाजाचा दृष्टीकोन याबद्दल भाष्य केलं. मात्र त्याचवेळी भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावण्यासही ते विसरले नाहीत.

आपण महिलांना स्व-संरक्षणाचे धडे शिकवले पाहिजे. महिला सुरक्षित राहण्यासाठी पुरुषांवरही जबाबदारी आहे. जेंडर इक्वॅलिटी शाळेत शिकवली पाहिजे. मन साफ आणि शुद्ध झालं पाहिजे. महिला कमकुवत नाही हे बिंबवलं पाहिजे, जे पुरुष करतात ते महिलाही करतात. महिला पोलीस अधिकारी जिथे असतात तिथे कायदा सुव्यवस्था चांगली असते. मला कुणाकडे बोट दाखवायचे नाही, पण पब्लिक डिसकोर्स बदलला पाहिजे,' अशी अपेक्षा आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

देवेंद्र फडणवीसांना लगावला टोला

एका मुद्द्यावरून शिवसेनेवर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील, आम्ही नाही, असं म्हटलं होतं. फडणवीसांच्या या टीकेवर आदित्य ठाकरे यांनी तेव्हा फडणवीसांना महिलांचा अपमान केला, असं म्हणत माफी मागण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा याच मुद्द्यावरून फडणवीसांना टोला लगावला आहे. 'हातात बांगडी घातली का हे बोललं जातं. झाशीची राणी बांगड्या घालून युद्ध लढली,' असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

हेही वाचा- भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे अडचणीत, फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्याचे आदेश

आदित्य ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे:

- एखादी घटना घडणार कशी नाही, हा विचार केला पाहिजे

- घरात,शाळेत संस्कार स्त्री करते

- आपण मुलांना right touch wrong touch शिकवलं पाहिजे

- महिला अत्याचार झाले की आपण स्त्रीला प्रश्न विचारतो, पण पुरुषांना प्रश्न विचारत नाही

- स्त्रीने काही कपडे घातले, किती वाजता बाहेर गेली हेच बोललं जातं

- आपल्या शिव्या ह्या कोणाच्या नावाने असतात त्या आई बहिणीच्या नावाने आहेत. वडील किंवा भावाच्या नावाने नाहीत

First published:

Tags: Aaditya thackeray, Devenfra fadanvis, Shivsena