15 जूनला आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. 20 जूनला विधानपरिषद निवडणूक होणार आहे.
महाराष्ट्रात अखंडता आणि शांतता ठेवणारी ही एक व्यक्ती आहे आणि अशा व्यक्तीला कुणीतरी धोका देतंय याचं वाईट वाटत आहे, असं भावनिक वक्तव्यही आदित्य ठाकरे यांनी केलं.
मुंबई, 24 जून : राज्याच्या राजकीय पेचप्रसंगावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. महाराष्ट्राची अखंडता आणि शांतता कायम राखणाऱ्या कुटुंबप्रमुखाला धोका दिल्याचं वाईट वाटतंय. याआधीही अनेकांनी शिवसेनेची गद्दारी केली त्यांचं काय झालं हे लोकांनी पाहिलं आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या बैठकीदरम्यान ते बोलत होते.
शिवसेनेचे जे बंडखोर आमदार आपली किंमत लावून तिथे गेले आहेत, त्यांना किती किंमत द्यायची हा प्रश्न आहे. याआधीही लोकांनी शिवसेनेशी गद्दारी केली आहे, पण त्यावेळी असं होतं की ती एक व्यक्ती विरोधीपक्ष सोडून सत्तापक्षात गेली होती ते केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी होतं. सत्ता येत असते जात असते, पण गेल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरे यांनी जे काम केले आहे त्यासाठी लोक समर्थन करत आहेत, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.
महाराष्ट्रात अखंडता आणि शांतता ठेवणारी ही एक व्यक्ती आहे आणि अशा व्यक्तीला कुणीतरी धोका देतंय याचं वाईट वाटत आहे, असं भावनिक वक्तव्यही आदित्य ठाकरे यांनी केलं.
'ठाकरे आणि शिवसेना हे नाव सोडून जगून दाखवा'; मुख्यमंत्र्यांचं बंडखोरांना आव्हान
आम्ही दोन दिवसांपूर्वी जेव्हा वर्षा सोडली तेव्हा तिथल्या प्रत्येक स्टाफच्याही डोळ्यात पाणी होतं. रस्त्यावरील शिवसैनिकांच्या डोळ्यात पाणी होतं. मला त्यावेळी माझी आई म्हणाली धोका मित्रपक्षांनी दिला असता तर काही वाटलं नसतं पण आपल्याच माणसाला ज्याला आपण मोठं केलं त्यानेच धोका दिला याचं वाईट वाटतं.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, कोविड काळात लोकांना मुख्यमंत्री साहेब भेटू शकत नव्हते, ते साहाजिक होतं. त्याचा फायदा घेऊन या लोकांनी आपला फायदा करून घेतला. हे सगळं झाल्यावरही उद्धवसाहेबांनी सांगितलं कुणालाही थांबवू नका. ज्याला जायचं त्याला जाऊ द्या. जातील त्यांना काही दिवसांसाठी काहीतरी थोडं मिळेल. पण काम झाल्यानंतर त्यांना संपवणार नाही याची काहीच गॅरंटी नाही. प्राईस टॅग लागल्यासारखे सगळे गेले आहेत. त्यामुळे जे सोबत उभे राहिले ते आपले, जे समोर उभे राहिले ते त्यांचे आहेत.
राज्यात ज्या मुख्यमंत्रीपदावरुन एवढं महाभारत सुरुय, त्यांची ताकद, पात्रता, पगार माहितीय का?उद्धव ठाकरे काय म्हणाले?
कोण कोण कोणत्यावेळी आपल्याशी कसं वागलं हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मी त्यादिवशी मनातलं सगळं सांगितलं, आजही मन मोकळं करणार आहे. मी वर्षा सोडली म्हणजे मोह सोडला, जिद्द सोडली नाही. स्वप्नातसुद्धा मी विचार केला नव्हता की मी या पदावर जाईन, त्या पदाचा मला कधीच मोह नव्हता, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.