परिचारिका ते महापौर किशोरी पेडणेकर यांचा थक्क करणारा प्रवास

परिचारिका ते महापौर किशोरी पेडणेकर यांचा थक्क करणारा प्रवास

मुंबईच्या महापौरपदी भारतातील धनवान महिला किशोरी पेडणेकर यांची बिनविरोध निवड.

  • Share this:

मुंबई, 22 नोव्हेंबर: मुंबईच्या महापौरपदी भारतातील धनवान महिला किशोरी पेडणेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपमहापौरपदी सुहास वराडकर यांची निवड करण्यात आली आहे. किशोरी पेडणेकर यांची बिनविरोध निवड झाली असली तरीही शिवसेनेच्या गोटात काहीसा नाराजीचा सूर असल्याची चर्चा आहे. आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदासंघातील प्रचारात त्यांचा मोलाचा वाटा होता. महिलांना एकत्र आणण्यापासून ते मतदारांच्या घरोघरी जाऊन संपर्क साधण्यापर्यंत त्यांची मोलाची कामगिरी होती. त्यांच्या या मेहनतीला अखेर यश मिळालं आहे. किशोरी पेडणेकर यांची मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड करण्यात आली आहे.

परिचारीका ते महापौरपद असा आहे किशोरी पेडणेकरांचा प्रेरणादायी प्रवास...

किशोरी पेडणेकर यांचा जन्म एका गिरणी कामगाराच्या घरात झाला होता. विवाहानंतर न्हावा शेवा इथल्या रुग्णालयात त्या परिचारीका म्हणून सुरुवातीला काम करत होत्या. त्यातून त्यांना समाजकार्याची गोडी निर्माण झाली. त्यांनी शिवसेना संघटनेसोबत काम करण्याचं ठरवलं. त्यांनी सेनेकडून लोअर परळ, वरळी आणि आसपासच्या भागांमध्ये शिवसेनेकडून काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातील उपविभाग संघटक ते नगरसेवक अशा वेगवेगळ्या पदांवर त्यांनी कामं केली. 2002 रोजी पहिल्यांदा त्या निवडणूक लढवून नगरसेवक म्हणून पालिकेवर निवडणून आल्या. त्यांनी बालकल्याण आणि स्थापत्य समिती शहर अध्यक्षपदासाठी काम केलं आहे. त्यानंतर पुन्हा 2012 आणि 2017 रोजी किशोरी पेडणेकर यांची नगरसेवक म्हणून निवड झाली होती. स्थायी समितीच्या बैठकांमध्ये त्यांनी शिवसेनेची बाजू कायम उचलून धरली. आक्रमक आणि निष्ठावान नगरसेवक म्हणून महापालिकेत त्यांची एक वेगळी ओळख आहे. राजकारणातून समाजकारण करण्याचा त्यांचा मानस आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 22, 2019 12:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading