शिवसेना पुन्हा सत्तेतून बाहेर पडण्याच्या विचारात?

शिवसेना पुन्हा सत्तेतून बाहेर पडण्याच्या विचारात?

जर विकासकामं होत नसतील तर निर्णय घ्यायची वेळ आली आहे, तुमची मानसिकता आहे का? अशी उद्धव ठाकरेंनी आमदारांना विचारणा केली. त्यावर योग्य तो निर्णय घ्यावा आम्ही सोबत असल्याचं आमदारांनी आश्वासन दिलं.

  • Share this:

मुंबई, 18 सप्टेंबर : शिवसेना पुन्हा एकदा सत्तेतून बाहेर पडण्याचा विचार करतेय, असं दिसतंय. मातोश्रीवर झालेल्या मंत्री आणि आमदार यांच्या बैठकीत सत्तेत राहायचे नाही यावर चर्चा झाली. या बैठकीनंतर संजय राऊत म्हणाले, 'आम्ही निर्णयाच्या जवळ आलो आहोत.सत्तेतून बाहेर पडायचं का, यावरही चर्चा झाली.'

महाराष्ट्रात महागाई वाढली आहे , प्रचंड नाराजी आहे या नाराजीचा फटका सेनेला बसू नये , यासाठी राज्यव्यापी धडक मोर्चा काढण्याचा निर्णय झाला , सरकारच्या भविष्याविषयी काय निर्णय घ्यावा , सत्तेत राहायचे नाही यावर चर्चा झाली.

शिवसेनेची विकासकामं होत नसल्यानं मुख्यमंत्र्यांना शेवटचं अल्टीमेटम द्यायचं ठरलं.  दसरा- दिवाळीआधीच फुटणार राजकीय फटाके?  शिवसेनेच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी विकास कामं होत नसल्याची उद्धव ठाकरेंकडे तक्रार  केली.  शिवसेनेच्या मंत्र्यांनाच अधिकार नसल्याने काम होत नसल्याची  खंत व्यक्त केली.

जर विकासकामं होत नसतील तर निर्णय घ्यायची वेळ आली आहे, तुमची मानसिकता आहे का? अशी उद्धव ठाकरेंनी आमदारांना विचारणा केली. त्यावर योग्य तो निर्णय घ्यावा आम्ही सोबत असल्याचं आमदारांनी आश्वासन दिलं. म्हणजे दसरा-दिवाळी आधीच फटाके फुटण्याची शक्यता आहे.

First published: September 18, 2017, 3:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading