मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /प्रभादेवीनंतर आता 'या' स्थानकांचीही बदलणार नावं!

प्रभादेवीनंतर आता 'या' स्थानकांचीही बदलणार नावं!

 मुंबईत रेल्वे स्टेशनचं नाव बदलण्याचा सपाटाच सुरू आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

मुंबईत रेल्वे स्टेशनचं नाव बदलण्याचा सपाटाच सुरू आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

मुंबईत रेल्वे स्टेशनचं नाव बदलण्याचा सपाटाच सुरू आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

  मुंबई, 12 ऑगस्ट : मुंबईत रेल्वे स्टेशनचं नाव बदलण्याचा सपाटाच सुरू आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गेल्या काही दिवसांधी एलफिस्टन रोड या नाव  रेल्वे स्थानकाचं नाव प्रभादेवी असं करण्यात आलं. मराठी बाणा जपण्यासाठी शिवसेनं तशी मागणीच केली होती. आताही मराठी माणसाचे कैवारी असलेल्या शिवसेनेने मुंबईच्या आणखी काही स्थानकाचं नाव बदलण्याची मागणी केली आहे.

  शिवसेनेनं आता त्यांचा मोर्चा जैनांकडे वळवला आहे. आणि किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकाचं नाव बदलून पार्श्वधाम ठेवावं तर मुंबई सेंट्रल या स्थानकाचं नाव जग्गनाथ शंकर शेठ ठेवावं अशी मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांआधीच हा भाग जैन बहुल असल्यानं स्टेशनचं नाव बदलण्याची मागणी करत असल्याचं राहुल शेवाळेचं म्हणणं आहे.

  आता तसं पहायला गेलं तर मुंबई सेंट्रल, सॅण्डहर्स्ट रोड, चर्नीरोड, करी रोड, काॅटनग्रीन या स्थानकांची नावंही ब्रिटीशकालीनच आहेत. त्यामुळे आता या स्थानकांची नावंही शिवसेना बदलण्याचा पवित्रा घेणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण स्थानकांची नावं बदलून मराठी मतदार आपल्याकडे वळवता येतील का याबाबत संभ्रम आहे.

  दरम्यान, मुंबईच्या ह्रदयस्थानी मध्य रेल्वे मार्गावरील महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक एलफिन्स्टन रोड. 1853 ते 1860 या काळात बॉम्बे प्रेसिडेन्सी चे गव्हर्नर राहिलेले लॉर्ड एलफिन्स्टन याचं नावं या स्टेशनला दिलं गेलं होतं. 18 जुलैच्या मध्यरात्रीपासून हे रेल्वे स्थानक ‘प्रभादेवी’ या नावाने ओळखलं जातं आहे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने या रेल्वे स्थानकावर होणाऱ्या उद्घोषणा, तसेच या रेल्वे स्थानकावरुन ये-जा करणाऱ्या सर्व उपनगरीय गाड्यांमधील उद्घोषणामध्ये व इंडीकेटर्समध्ये ‘एलफिन्स्टन रोड’ ऐवजी ‘प्रभादेवी’ असा बदल केला आहे.

  त्यामुळे आता काही दिवसात किंग सर्कल आणि मुंबई सेंट्रल या स्थानकांची नावं आपल्याला बदललेली पहायला मिळणार आहेत.

  First published:

  Tags: Mumbai, Railway station name