Home /News /mumbai /

shivsena dasara melava : उद्धव ठाकरेंकडून राज यांची स्टाईल, जाहिरातीतून हर्षवर्धन पाटलांची केली मिमिक्री

shivsena dasara melava : उद्धव ठाकरेंकडून राज यांची स्टाईल, जाहिरातीतून हर्षवर्धन पाटलांची केली मिमिक्री

'हर्षवर्धन पाटील अनाहुतपणे बरोबर बोलून गेले. भाजपमध्ये गेल्यावर शांतपणे झोप येत आहे. ही लोक तिकडे ब्रँड अँम्बेसडर सारखी वागत आहे.'

'हर्षवर्धन पाटील अनाहुतपणे बरोबर बोलून गेले. भाजपमध्ये गेल्यावर शांतपणे झोप येत आहे. ही लोक तिकडे ब्रँड अँम्बेसडर सारखी वागत आहे.'

'हर्षवर्धन पाटील अनाहुतपणे बरोबर बोलून गेले. भाजपमध्ये गेल्यावर शांतपणे झोप येत आहे. ही लोक तिकडे ब्रँड अँम्बेसडर सारखी वागत आहे.'

  मुंबई, 15 ऑक्टोबर : शिवसेनेचा दसरा मेळावा दणक्यात पार पडला. अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray ) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. केंद्रीय नेत्यांपासून ते राज्यातील नेत्यांवर टीकास्त्र सोडले. पण, पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांची चक्क जाहिरातीची नक्कल करत उद्धव ठाकरे यांनी भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील (harshvardhan patil) यांची खिल्ली उडवली. (uddhav thackeray dasara speech 2021) दोन दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर सभेतून आपण भाजपमध्ये आल्यापासून शांत झोप लागते, ना कोणती चौकशी ना, कुठे ईडीची नोटीस असं काहीही होत नाही, अशी कबुलीच हर्षवर्धन पाटील यांनी देऊन टाकली. त्यांच्या या विधानाचा समाचार घेत उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन पाटील यांची चांगलीच खिल्ली उडवली. हर्षवर्धन पाटील अनाहुतपणे बरोबर बोलून गेले. भाजपमध्ये गेल्यावर शांतपणे झोप येत आहे. ही लोक तिकडे ब्रँड अँबेसडर सारखी वागत आहे.  टिव्हीवर जाहिराती येते ना,' पहिले तो मुझे निंद की गोली खा के भी निंद नही आती ती थी, दरवाजे पर टक टक होती, तो भी निंद नही आती. फिर मुझे भाजप मैं जाने को कहा है, अब मैं कुंभकर्ण  की तरह सो गया हुँ, टकटक किया तो भी उठता नही' असं भाजपमध्ये  गेलेल्या लोकांचं झालं आहे. अशा लायकीचे लोक आपल्याला धमक्या देत आहे. आमच्या अंगावर आला तर सोडणार नाही. तुमच्या अंगावर येण्यासारखं तुमच्यामध्ये काही आहे तरी काही का? असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

  अरे देवा! तरुणाने केला गर्लफ्रेंडचा भांडाफोड; त्या सवयी सोशल मीडियावर शेअर

  जर तुम्हाला धमकी द्यायची असेल तर स्वत: च्या लायकीनुसार द्या, ईडी सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या  मागे उभे राहुन काय बोलता. मी सुद्धा आज पक्षप्रमुख म्हणून बोलायचं झालं तर शिवसैनिकांच्या ताकदीतून उत्तर द्यायला तयार आहे. पोलिसांच्या मागे लपून बसायचे म्हणजे हे नामर्दपणा आहे, असंही उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं. High Alert in Delhi: सणासुदीच्या काळात राजधानी दिल्लीत अतिरेकी हल्ल्याचा धोका 'उद्या हक्काच्या या सत्तेला दोन वर्ष होतील. सत्ता पाडण्यासाठी अनेक प्रयत्न केले. आजपण हिंमतीने सांगतो सरकार पाडून दाखवाच. पण, आपल्याकडे एक खेळ आहे, छापा की काटा, छापा टाकायचा आणि काटा काढायचा. हे जास्ती थेरी चालणार नाही, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला.
  Published by:sachin Salve
  First published:

  पुढील बातम्या