• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • shivsena dasara melava : 'मोहनजी तुम्हाला हे मान्य आहे का? लखीमपूरच्या घटनेवरून उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

shivsena dasara melava : 'मोहनजी तुम्हाला हे मान्य आहे का? लखीमपूरच्या घटनेवरून उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

 आपले पूर्वज हे एकच होते. हे जर आपल्याला मान्य असेल तर विरोधी पक्षाचे पूर्वज काय परग्रहावरून आले होते का, लखीमपूरमध्ये शेतकरी ठार मारले, ती माणसं काय परग्रहावरून आली आहे का?

आपले पूर्वज हे एकच होते. हे जर आपल्याला मान्य असेल तर विरोधी पक्षाचे पूर्वज काय परग्रहावरून आले होते का, लखीमपूरमध्ये शेतकरी ठार मारले, ती माणसं काय परग्रहावरून आली आहे का?

आपले पूर्वज हे एकच होते. हे जर आपल्याला मान्य असेल तर विरोधी पक्षाचे पूर्वज काय परग्रहावरून आले होते का, लखीमपूरमध्ये शेतकरी ठार मारले, ती माणसं काय परग्रहावरून आली आहे का?

  • Share this:
    मुंबई, 15 ऑक्टोबर : आपले पूर्वज हे एकच आहे, असं  मोहन भागवत म्हणाले होते. हे जर आपल्याला मान्य असेल तर विरोधी पक्षाचे पूर्वज काय परग्रहावरून आले होते का, लखीमपूरमध्ये शेतकरी ठार मारले, ती माणसं काय परग्रहावरून आली आहे काय? असा खडा सवाल शिवसेना (shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी विचारला आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत वाद पेटण्याची चिन्ह आहे.(uddhav thackeray dasara speech 2021) शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडला.  यावेळी उद्धव ठाकरे यांनी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (mohan bhagwat) यांना विचारला आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये सुरू आहे.  यावेळी नेहमी प्रमाणे 'जमलेल्या माझ्या तमाम हिंदू माता आणि बंधू भगिनींनो...असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात झाली. यावेळी हिंदुत्त्वाच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांनी मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला. 'सकाळी संघाचा मेळावा झाला, मी जे काही बोलतोय याचा अर्थ असा नाही की, मी मोहन भागवत यांच्यावर टीका करत नाही. तुमचीच माणसं जर हे ऐकत नसतील तर ही मेळाव्याची थेरं करायची कशाला. हल्ली विचारांचं पायपोस कुणाला राहिलं नाही. मोहन भागवत यांचे विचार काय आहे तर आपले पूर्वज हे एकच होते. हे जर आपल्याला मान्य असेल तर विरोधी पक्षाचे पूर्वज काय परग्रहावरून आले होते का, लखीमपूरमध्ये शेतकरी ठार मारले, ती माणसं काय परग्रहावरून आली आहे का? एकीकडे तुम्ही हिंदूत्व म्हणजे, आम्ही कुणाचा द्वेष मत्सर करत नाही, असा विचार तुम्ही देताय पण दिवसाढवळ्या जे दिसतंय, ते मोहन भागवत तुम्हाला मान्य आहे का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. 'आमचं हिदुत्व म्हणजे, राष्ट्रीयत्व आहे. शिवसेनाप्रमुखांनी नेहमी सांगितलं आहे, माणूस म्हणून पहिला जन्माला येत असतो, घरात असल्यावर माणूस असतो आणि जेव्हा तो घरातून बाहेर पडतो तेव्हा देश हा माझा धर्म आहे म्हणून वाटचाल करतो. त्यावेळी जर कुणी आपल्या धर्माची मस्ती घेऊन वाटेत येत असेल तर आम्ही कडवट हिंदू म्हणून उभं राहणार आहोत, असंही उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं. 'हिंदू राष्ट्र हा संघ जेव्हा शब्द वापरतो. तेव्हा त्यामध्ये सत्तापिपासूपणा नसतो, त्यामध्ये सत्ता मिळवण्याची लालसा नसते. सत्तेसाठी संघर्ष करत असताना विवेक वापरावा, वैचारिक लढा हवा, युद्ध नको, आता तुमच्या वर्गातून जी माणसं बाहेर पडली आहे, त्यांनी सत्ता काबिज केली आहे. त्यांना एकदा शिकवणी लावा. सध्या जो काही खेळ चालू आहे, सर्व काही करायचं आहे पण मला सत्ता हवी आहे. सत्तेचं व्यसन हे एक अंमली प्रकार आहे आहे. अगदी बाजार उद्यान समित्यापासून ते  लोकसभेपर्यंत माझ्या अंमलाखाली पाहिजे, हा सुद्धा अंमली प्रकार आहे. या अंमली प्रकाराचा बंदोबस्त कोण करणार आहे, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.
    Published by:sachin Salve
    First published: