Home /News /mumbai /

shivsena dasara melava : मीच मुख्यमंत्री आहे असं वाटत नाही, कारण..., उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना सणसणीत टोला

shivsena dasara melava : मीच मुख्यमंत्री आहे असं वाटत नाही, कारण..., उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना सणसणीत टोला

मला स्वत: मी कधी मुख्यमंत्री आहे असं वाटू देत नाही. कारण मला तसं कधी वाटत नाही. माझं तर असं म्हणणं आहे, मी तुमच्या घरातलाच माणूस आहे.

    मुंबई, 15 ऑक्टोबर : 'मी स्वत:ला कधी मुख्यमंत्री आहे, असं वाटू देत नाही. कारण मला तसं कधी वाटत नाही. माझं तर असं म्हणणं आहे, मी तुमच्या घरातलाच माणूस आहे. ही माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे. काही जण म्हणत होते मी पुन्हा येईन, पण आता बस तिकडेच' असं म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांच्यावर घणाघाती प्रहार केला. (uddhav thackeray dasara speech 2021) शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडला.  यावेळी नेहमी प्रमाणे 'जमलेल्या माझ्या तमाम हिंदू माता आणि बंधू भगिनींनो...असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात झाली. मला कल्पना आहे, आपल्याला संधी मिळाली आहे. आपला आवाज कुणीच दाबू शकत नाही आणि आवाज दाबणारा कधी जन्माला येणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 'आजचा हा क्षण आपल्यासाठी खूप मोलाचा आहे. बाळासाहेबांनी ज्याची सुरुवात केली होती, तो तुमच्या साक्षीने आपण पुढे नेत आहोत. शस्त्र पुजन केल्यानंतर मी तुमच्यावर फुलं उधळली, कारण तुम्ही माझे खरे शस्त्र आहात' असंही उद्धव ठाकरे म्हणाले. मंदिरात चक्क देवीच्या मूर्तीसमोर चोरी; टोळीने सर्वांसमोर साधला डाव, पाहा VIDEO मला स्वत: मी कधी मुख्यमंत्री आहे असं वाटू देत नाही. कारण मला तसं कधी वाटत नाही. माझं तर असं म्हणणं आहे, मी तुमच्या घरातलाच माणूस आहे. मी तुमचा भाऊ आहे, ही माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे. काही जण म्हणत होते मी पुन्हा येईन, पण आता बस तिकडेच. कारण संस्कार हे महत्त्वाचे असतात, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना लगावला. नोराचा क्रॉप टॉपमध्ये हॉट बेली डान्स पाहून चाहते क्लिन बोल्ड; VIDEO VIRAL मला माझ्या आई-वडिलांनी शिकवलं पदं काय आहे, सत्ता तरी काय आहे, सत्ता येईल परत जाईल आणि पुन्हा येईल, पण कधी आहे मी कधीही अंहकार हा डोक्यात जाऊ देऊ नको, तू नेहमी जनतेशी नम्र राहा, जोरजबरदस्तीने काही मिळवता येत नाही, ते नम्र राहुनच मिळावे लागतात, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या