Home /News /mumbai /

राज्याच्या राजकारणाने घेतले नवे वळण, महाविकास आघाडी आणि भाजपसमोर 'ही' असेल आव्हानं!

राज्याच्या राजकारणाने घेतले नवे वळण, महाविकास आघाडी आणि भाजपसमोर 'ही' असेल आव्हानं!

भलेही विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाली असली तरी महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीचे राजकीय पडसाद भविष्यात दिसणार आहेत.

मुंबई, 11 मे : महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 9 जागेची निवडणूक अखेर बिनविरोध झाली आहे. काँग्रेसने आपला दुसरा उमेदवार मागे घेतल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. पण, भलेही विधान परिषद बिनविरोध झाली असली तरी महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीचे राजकीय पडसाद भविष्यात दिसणार आहेत, त्याचे प्रमुख काही कारण आहेत, असं म्हटलं जातं. महाविकास आघाडीत धुसफूस सुरू उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने 28 नोव्हेंबरला सुरुवात केली पण सहा महिने होण्याच्या आधीच महाविकास आघाडीत आता धुसफूस उघड पद्धतीने दिसू लागली आहे. विधान परिषदेच्याा निवडणुकीच्य निमित्ताने ही धुसफूस अधिक उघड झाल्याचे दिसून आले. महाराष्ट्रात  शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच पक्ष राज्यात सरकार चालवत आहे की काय, अशी भावना दिल्ली हायकमांडपर्यंत काँग्रेसच्या काही नेत्यांनी पोहोचवली. त्यानंतर काँग्रेस दिल्ली हायकमांड यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थोडासा झटका देण्याचं ठरवलं. त्यानंतर काँग्रेसने एक उमेदवार जाहीर केला असतानाही दुसरा उमेदवार देण्याचे भाष्य केले आणि विधानपरिषद बिनविरोध होण्याचे संकेत देखील दिले गेले. हेही वाचा - 'निवडणुकांचा घोडेबाजार करायचा आणि जनतेला ओझ्याचे गाढव करायचे',सेनेचा भाजपला टोला काँग्रेसच्या या खेळीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना चांगलेच दुखावले गेले. विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होत नसेल तर निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही, अशा स्वरूपाची भाषादेखील मुख्यमंत्री यांनी केली. त्यानंतर  शिवसेना आणि राष्ट्रवादीपक्षाकडून काँग्रेस पक्षााने दुसरी जागाा लढवू नये, असा आग्रह धरला त्यात यश देखील प्राप्त झाले पण यामुळे महाविकास आघाडीत भलेही वरून सर्व काही ठिकठाक आहे असंं चित्र निर्माण केले गेले असले, तरीही काही लोकांचं मन दुखावले गेले आहे. महाविकास आघाडी सरकारचा हनीमून पिरियड संपत आला आता खरं अंतर्गत कलह वारंवार उफाळून येईल, अशी राजकीय शक्यता वर्तवली जात आहे. भाजपमध्ये अंतर्गत गृहकलह भाजपाने चार नवीन उमेदवार दिले त्याचे राजकीय पडसाद भविष्यात दिसणार आहेत. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या  नावांना छेद देत नवीन चेहरे समोर आणत विधान परिषदेची उमेदवार दिली. त्यात सामाजिक आणि प्रादेशिक संतुलन ठेवण्याचा प्रयत्न देखील केला गेला. यामुळे जे पारंपारिक इच्छुक नेते उमेदवारीची दावेदारी करत होते. त्यांना मात्र तुर्तास शांत बसावे लागले. जे नेते दुखावले गेले ते भविष्यात परत उपद्रवमुल्य दाखवणार नाहीत ना, याची खबरदारी भाजप नेत्यांनाा घ्यावी लागणार आहे. दुसरीकडे राज्यात भाजपाचा हुकमी एक्का देवेंद्र फडवणीस हेच आहेत हे परत एकदा या निवडणुकीने सिद्ध केले आहे. फडणवीस यांनी पुढची पाच वर्ष लक्षात घेत नवीन चेहरे दिले आहेत पण त्याचे पडसाद भाजपाला भविष्यात मोजावे लागणार आहे. सर्वात फायदा राष्ट्रवादीला! महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राष्ट्रवादी पक्ष कायमच फायदाच राहिला आहे. खातेवाटप असो की, राज्यसभेच्या जागा यात राष्ट्रवादी पक्षाने फायदा मिळवला आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत देखील दोन जागा मिळवत राष्ट्रवादी अलगद वेगळा राहिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या भूमिकेमुळे शिवसेना काँग्रेस पक्षात नाराजी आहे. तुर्तास उघड बोलत नसले तरी त्याचे पडसाद भविष्यात उमटणार आहेत. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

Tags: Balasaheb thorat, BJP, Chandrakant patil, Congress, Sanjay raut, Shivsena, Uddhav Thackery

पुढील बातम्या