मोहन भागवतांच्या भाषणावर शिवसेनेनं दिली पहिली प्रतिक्रिया

मोहन भागवतांच्या भाषणावर शिवसेनेनं दिली पहिली प्रतिक्रिया

गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही राम मंदिर व्हावं यासाठी लढत आहोत, पण आता सगळेच याविषयावर बोलत आहेत अशी प्रतिक्रिया शिवसेनेकडून देण्यात आली आहे.

  • Share this:

विनया देशपांडे, प्रतिनिधी

मुंबई, 18 ऑक्टोबर : गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही राम मंदिर व्हावं यासाठी लढत आहोत, पण आता सगळेच याविषयावर बोलत आहेत अशी प्रतिक्रिया शिवसेनेकडून देण्यात आली आहे. आज नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मोहन भागवत यांनी राम मंदिर लगेचच बांधा असं म्हटलं आहे. त्यावर शिवसेनेनं ही पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

आम्ही सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याचं स्वागत करतो. राम मंदिर बांधण्यासाठी सरकारने लवकरच अध्यादेश काढला पाहिजे. पण गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही राम मंदिराच्या मुद्द्यावर आवाज उठवत आहोत. पण आता सगळेच आम्हाला फॉलो करत आहेत असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

सध्या सरकारकडे बहुमत आहे. पण पुढच्या निवडणुकांपर्यंत कोणत्याही पक्षाकडे बहुमत राहणार नाही. त्यामुळे राम मंदिर बांधण्यावर आताच अध्यादेश काढला पाहिजे अशी प्रतिक्रिया शिवसेनेनं सीएनएन न्यूज 18शी बोलताना दिली.

दरम्यान, केंद्रात भाजप सरकार आहे, राज्यात भाजप सरकार आहे आणि राष्ट्रपतींकडूनही हा अध्यादेश डावलला जाऊ शकत नाही. त्यामुळे राम मंदिर बांधण्यासाठी लवकरात लवकर अध्यादेश काढा अशी भूमिका शिवसेनेनं मांडली आहे.

VIRAL VIDEO: 425 कोटींचे दागिने घालून या बायका खेळतायत गरबा!

First published: October 18, 2018, 12:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading