सरकार खरेच बुळचट आहे काय?; शिवसेनेची मोदींवर टीका

सरकार खुळचट आणि बुळचट निघाले आहे काय?' अशी टीका करत सामनामधून सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 26, 2017 05:43 PM IST

सरकार खरेच बुळचट आहे काय?; शिवसेनेची मोदींवर टीका

26 डिसेंबर : गुजरात निवडणुकांनंतर पुन्हा एकदा सामनातून मोदींवर टीका करण्यात आली आहे. 'कालच्या चारही शहिदांच्या भडकलेल्या चितांची ठिणगी १२५ कोटी जनतेच्या मनातील लाव्हा बनून विचारीत आहे. सरकार खुळचट आणि बुळचट निघाले आहे काय?' अशी टीका करत सामनामधून सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.

सामनात लिहिलंय की, 'गुजरातच्या निवडणुकीनंतर 'व्ही फॉर व्हिक्टरी'ची खूण दाखवत विजयी ढोल बडविणे हाच देशाभिमान आणि शौर्य असेल तर आमच्या जवानांच्या भडकलेल्या चिता म्हणजे निवडणूक प्रचाराची शेकोटी आहे काय? गुजरात, हिमाचल जिंकले आहे. सीमेवर जवानांचे रक्त सांडते आहे. आता पुढच्या निवडणुका कधी आहेत? शहीद परगत सिंग याच्या वडिलांचा आक्रोश हिमालयासही हादरे देत आहे. आम्ही अस्वस्थ आहोत.' असं लिहून सामनाने पुन्हा एकदा गुजरात निवडणुकांच्या विजयावर टीका केली आहे.

23 डिसेंबरला राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या सैन्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन करून भारतीय सैन्यावर गोळीबार केला. त्यात आपले तीन जवान शहीद झाले. पण याचाच बदला आज भारतीय सैन्याने एलओसी पार करून घेतला आहे. पुलवामा इथं दहशतवाद्यांसोबत सुरू असलेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 26, 2017 01:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...