२०१९ ला कोसळून पडू नये हीच सदिच्छा, सेनेचा भाजपला टोला

'या निकालाचा अर्थ एका वाक्यात सांगायचा तर वारे बदलले नाहीत हे खरं, पण वारे मंदावले आहेत'!

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 19, 2017 09:03 AM IST

२०१९ ला कोसळून पडू नये हीच सदिच्छा, सेनेचा भाजपला टोला

19 डिसेंबर : गुजरातच्या निकालावर सामनामधून भाजपवर सडकून टीका करण्यात आली आहे. 'या निकालाचा अर्थ एका वाक्यात सांगायचा तर वारे बदलले नाहीत हे खरं, पण वारे मंदावले आहेत'! अशा शब्दांत पंतप्रधान मोदींना चिमटे काढण्यात आलेत.

'गुजरात मॉडेल डळमळले आहे. २०१९ साली ते कोसळून पडू नये हीच सदिच्छा'. अशीही टीका करत सेनेनं भाजपवर निशाणा साधलाय. पण विशेष म्हणजे, गुजरातमध्ये शिवसेनेचा दारुण पराभव झाला पण त्याबद्दल आजच्या अग्रलेखात कोणतंही भाष्य करण्यात आलेलं नाही.

सामनातून अशीही टीका...

'गुजरात आणि हिमाचलमध्ये भाजपचा विजय झाला, पण काँग्रेसचाही पराभव झाला नाही. काँग्रेसमुक्त हिंदुस्तानचे स्वप्न पूर्ण झाले नाही. सिंहाच्या कानफटात मारून माकडांनी धोक्याची घंटा वाजवली आहे. 'हम करे सो कायदा'वाल्यांसाठी हा निर्वाणीचा इशारा आहे.'

Loading...

खरं तर गुजरातमध्ये शिवसेना आपल्या जागा राखू शकली नाही. शिवसेनेच्या उमेदवारांना आपलं डिपॉझिटही वाचवता आलेलं नाही. याच मुद्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला चांगलेच चिमटे काढलेत. तर शिवसेनेनं निवडणुकीत जय-पराजय होतच असतात. आम्ही गुजरातमध्ये पुढच्या निवडणुकाही लढू, असा निश्चय शिवसेनेच्या संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 19, 2017 09:02 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...