'सर्जिकल स्ट्राईकला मोदी स्वत: बंदूक घेऊन गेले नव्हते तरी श्रेय घेतलंच ना?'

'सर्जिकल स्ट्राईकला मोदी स्वत: बंदूक घेऊन गेले नव्हते तरी श्रेय घेतलंच ना?'

सैनिकांच्या शौर्याचं श्रेय घेणार असाल तर अवनीला गोळी मारल्याचं पापही सुधीरभाऊ आणि सरकारने घ्यायला हवं, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

  • Share this:

मुंबई, 10 नोव्हेंबर : 'सुधीर मुनगंटीवार बंदूक घेऊन अवनी वाघिणीला गोळी मारायला गेले नव्हते, असं मुख्यमंत्री म्हणतात. मग सर्जिकल स्ट्राईकला मोदी देखील स्वत: बंदूक घेऊन गेले नव्हते. सैनिकांच्या शौर्याचं श्रेय घेणार असाल तर अवनीला गोळी मारल्याचं पापही सुधीरभाऊ आणि सरकारने घ्यायला हवं,' असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

‘अवनी प्रकरणी कमिटी स्थापन करण्याचे नाटक केले जात आहे. ज्यांना शिकारीसाठी नेमले होते त्यांनाच न्यायमूर्ती म्हणून नेमले आहे. याप्रकरणी न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे आणि निःपक्षपातीपणे ही चौकशी व्हायला हवी,’ अशी मागणी करत उद्धव ठाकरे यांनी अवनी वाघिणीला ठार केल्याप्रकरणी राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

मुख्यमंत्र्यांना टोला

अवनीला ठार केल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची पाठराखण केली. त्यावरून आता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी अवनीला गोळ्या झाडलेल्या व्यक्तीचा सत्कार करायला हवं,’असं उद्धव ठाकरे म्हणाले.

 मंदिरातला दिवा पेटवण्याआधी चूल पेटवणं गरजेचं

‘शिवसेनेकडून 5000 घरांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं. शिवसेनेचा कामावर विश्वास आहे. मंदिरातला दिवा पेटवण्याआधी लोकांच्या घरातील चूल पेटवणं गरजेचं आहे,’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.

गडकरींकडूनही मुनगंटीवारांची पाठराखण

अवनी वाघिणीच्या हत्येनंतर वनविभाग आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीकेची झोड उठली असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मात्र सुधीर मुनगंटीवार यांची पाठराखण केली आहे. सुधीर मुनगंटीवार हे तर खरे वाघमित्र आहेत. त्यामुळे त्यांचा राजीनामा मागणं चुकीचं असल्याचं वक्तव्य गडकरींनी केलं आहे.

गरीब, आदिवासी शेतकऱ्यांवर हल्ला करणाऱ्या वाघिणाला मारल्याचं दुःख आहे पण दुसरा उपाय नव्हता असंही गडकरी म्हणाले. नागपूरमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुनगंटीवारांमुळेच वाघांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अवनी वाघीण प्रकरणात त्यांचा राजीनामा मागणं चुकीचं असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

VIDEO: दगड डोक्यात घालून दोन जणांना केली जबर मारहाण

First published: November 10, 2018, 2:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading