“मंदिरासाठी आंदोलनाची वेळ आणणाऱ्या सरकारला RSS खाली खेचणार का?”

“मंदिरासाठी आंदोलनाची वेळ आणणाऱ्या सरकारला RSS खाली खेचणार का?”

'राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरच राम मंदिरासाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे. मग संघाने जे सरकार बसवलं आहे, ते सरकार संघ खाली खेचणार का’

  • Share this:

मुंबई, 2 नोव्हेंबर : ‘तुमच्यावरच आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर मग या सरकारला सत्तेवरून खाली खेचणार का,’ असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला केलाय. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी सरकारला लक्ष्य केलं.

‘आत्ताचं सरकार हे हिंदुत्ववादी सरकार असल्याचं मानलं जातं होतं. पण या सरकारकडून राम मंदिराचा मुद्दा बाजूला सारला गेला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरच राम मंदिरासाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे. मग संघाने जे सरकार बसवलं आहे, ते तुम्ही खाली खेचणार का,’ असा सवाल उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला केलाय.

दरम्यान, राम मंदिराच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार आहेत. या अयोध्या दौऱ्याची तयारी सुरू असल्याची माहितीही उद्धव यांनी या पत्रकार परिषदेत दिली.

‘दुष्काळाबाबत आमदारांना आदेश’

उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना आमदार आणि खासदार यांची बैठक घेतली. यावेळी आपण दुष्काळात महाराष्ट्र दौरा करणार असून दुष्काळग्रस्त भागात मदत करण्याचे आदेश आमदारांना देण्यात आले आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

VIDEO : क्रिकेटच्या मैदानात फडणवीसांची फटकेबाजी

First published: November 2, 2018, 4:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading