S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

शिवसेनेची पोस्टरबाजी; कर्जमाफीवरुन सत्ताधाऱ्यांमध्ये श्रेयवादाची लढाई

Samruddha Bhambure | Updated On: Jun 12, 2017 11:01 AM IST

शिवसेनेची पोस्टरबाजी; कर्जमाफीवरुन सत्ताधाऱ्यांमध्ये श्रेयवादाची लढाई

12 जून : राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी घोषित केली नाही, तोच आता शिवसेना- भाजपमधील श्रेयवादाच्या लढाईचा दुसरा अंक सुरू झाला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं श्रेय फक्त एकट्या भाजपला घेऊ नये म्हणून शिवसेनेनंही आता पोस्टरबाजी सुरू केलं आहे. शिवसेनेकडून लावण्यात आलेल्या या बॅनर्सवर कर्जमाफीच्या निर्णयाचे श्रेय पूर्णपणे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आलं आहे.

नरीमन पॉईन्ट येथील भाजपच्या मुख्य कार्यालयासमोर शिवसेनेनं 'शेतकर्यांचा ऐतिहासिक विजय' अशा आशयाचं मोठं होर्डिंग लावलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांच्या लढ्याला अभूतपूर्व यश मिळाले. अखेर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला, असा मजकूर या बॅनर्सवर छापण्यात आला आहे. त्यामुळे आता कर्जमाफीचं श्रेय घेण्यासाठी भाजप-शिवसेनेमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे, सरसकट कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन शिवसेना भाजप पुन्हा आमनेसामने आले आहेत . सरसकट कर्जमाफी ताबडतोब दया नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशारा शिवसेनेनं दिला आहे . शिवसेना पक्ष प्रमुख यांनी यासंदर्भात प्रसिद्धीपत्रकच काढलं आहे कर्जमाफीवरुन बँका शेतकऱ्यांना नडल्या तर अशा बॅंकांना हिसका दाखवा असा सल्लाही सेनेनं शेतकऱ्यांना दिला आहे.त्यामुळे कर्जमाफीवरून भाजप-शिवसेना यांच्यात पुन्हा एकदा जुंपणार असल्याचे चित्र आहे. मात्र, भाजप या सगळ्याला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 12, 2017 09:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close