युतीच्या चर्चेत नवा ट्विस्ट, 'भाजपचा दिल्लीतील कोणताही नेता 'मातोश्री'ची पायरी चढणार नाही'

युतीची चर्चा ट्रॅकवर आणण्यासाठी भाजपचे दिल्लीतील मोठे नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'वर जाणार असल्याचं बोललं जात होतं.

News18 Lokmat | Updated On: Feb 14, 2019 08:39 AM IST

युतीच्या चर्चेत नवा ट्विस्ट, 'भाजपचा दिल्लीतील कोणताही नेता 'मातोश्री'ची पायरी चढणार नाही'

मुंबई, 14 फेब्रुवारी : युतीची चर्चा ट्रॅकवर आणण्यासाठी भाजपचे दिल्लीतील मोठे नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'वर जाणार असल्याचं बोललं जात होतं. पण भाजपचा दिल्लीतील कोणताही नेता युतीकरता मातोश्रीची पायरी चढणार नाही, अशी माहिती आता भाजपमधील सूत्रांकडून मिळाली आहे.

युतीबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतील युतीचा अंतिम फॉर्म्युला दिल्लीत नव्हे तर राज्यातच ठरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शिवसेनेकडून युतीसाठी गेल्या काही दिवसांपासून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळेच मग आता शिवसेनेला सोबत घेण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठीच आता भाजपकडून अमित शहा, नितीन गडकरी आणि राजनाथ सिंग हे तीन दिग्गज नेते मातोश्रीवर जाणार असल्याचं वृत्त बुधवारी आलं होतं. पण भाजपमधील सूत्रांनी हे वृत्त फेटाळलं आहे.

महाराष्ट्रात युतीचा बिहार पॅटर्न?

लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना सर्वांच्या मुखी एकच चर्चा ऐकायला मिळत आहे. शिवसेना – भाजप युतीचं काय? युती होणार कि स्वबळावर लढणार? कोण जिंकणार सर्वाधिक जागा? अशातच शिवसेनेनं भाजपसमोर 1995च्या फॉर्म्युल्यानुसार चालण्याचा आग्रह धरल्यानं भाजप शिवसेनेसमोर नमते घेणार का? अशी चर्चा सध्या दिवसभर रंगताना दिसत आहे. या साऱ्या घडामोडींकडे पाहिल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण देखील 'बिहार'च्या वाटेवर आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Loading...

काय झालं बिहारमध्ये?

बिहारमध्ये देखील लोकसभेच्या जागा वाटप करताना भाजपनं जदयू समोर अर्थात नितीश कुमार यांच्यापुढे नमतं घेतलं. नव्या फॉर्म्युल्यानुसार लोकसभेच्या एकूण 40 जागांपैकी जदयू 17, भाजप 17 आणि रामविलास पासवान यांची लोकजनशक्ती पार्टी 6 जागा लढवेल असा फॉर्म्युला ठरला. 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला 22, लोकजशक्ती पार्टीला 6 आणि भाजपविरोधात लढणाऱ्या जदयूला केवळ 2 जागा जिंकता आल्या होत्या.

पण, बिहारमधील नितीश कुमार यांचं वाढतं महत्त्व लक्षात घेता भाजपनं नितीश कुमार यांच्यासमोर नमतं घेतल्याचं चित्र पाहायाला मिळालं. त्यामुळे शिवसेनेना ताठर भूमिका घेत नितीश कुमार यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतंय. त्यामुळे भाजप देखील 'चक्रव्युहात' अडकल्याचं पाहायला मिळत आहे.


मन हेलावून टाकणारी घटना; एका क्षणात 7 वर्षाचा मोनिश कोसळला


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 14, 2019 08:38 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...