S M L

विशेष अधिवेशन बोलवा, शिवसेना आणि विरोधक एकवटले

शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधक आणि शिवसेना पुन्हा आक्रमक झाले आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं अशी मागणी विरोधी पक्षांकडून राज्यपालांकडे करण्यात येणार आहे.

Sachin Salve | Updated On: May 2, 2017 05:52 PM IST

विशेष अधिवेशन बोलवा, शिवसेना आणि विरोधक एकवटले

02 मे : शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधक आणि शिवसेना पुन्हा आक्रमक झाले आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं अशी मागणी विरोधी पक्षांकडून राज्यपालांकडे करण्यात येणार आहे.

तूर खरेदीवर घोटाळा उघड झाल्यानंतर अखेर विरोधकांना जाग आलीये. संघर्षयात्रेतून वेळ काढून अखेर विरोधकांनी बाह्यावर करून मैदानात उतरले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि तूर खरेदीसाठी विशेष अधिवेशन बोलावं अशी मागणी विरोधकांनी केलीये. यासाठी आज विरोधी पक्षातले नेते राज्यपालांची भेट घेण्यासाठी राजभवनला जाणार आहे.  यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित असतील. तर दुसरीकडे विरोधकापाठोपाठ आता सेनेनेनही विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे. तूर खरेदी संदर्भात शिवसेनेने आवाज उठवला आहे.

दरम्यान, राज्यात एवढी तूर कोंडी झाली असतानाही शिवसेनेनं साधं आंदोलनही केलं नव्हतं. पण राज्यात तूर खरेदी घोटाळा झाल्याचं उघडfकीस येताच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून भाजपवर टीकेची झोड उठवण्यात आलीय. तसंच तुरीच्या प्रश्नावर सेना आमदार मुख्यमंत्र्यांच्या दरबारी गेले आहे. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि सेना आमदारांमध्ये तूर खरेदीसंदर्भात चर्चा सुरु आहे. पण मुळ्यात शिवसेनेला शेतकऱ्यांबद्दल अचानक जाग का आली असा प्रश्न उपस्थित होतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 2, 2017 05:52 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close