लोअर परेल पुलाच्या पाहणीदरम्यान शिवसेना आणि मनसेचा राडा!

लोअर परेल रोड ओव्हब्रीजचा पाहणीदरम्यान गुरुवारी मनसेचे पदाधीकारी संतोष धुरी आणि शिवसेनेचे आमदार सुनिल शिॅदे यांच्यात चांगलाच राडा झाला.

News18 Lokmat | Updated On: Jul 26, 2018 05:13 PM IST

लोअर परेल पुलाच्या पाहणीदरम्यान शिवसेना आणि मनसेचा राडा!

मुंबई, ता. 26 जुलै : लोअर परेल रोड ओव्हब्रीजचा काही भाग पादचाऱ्यांसाठी सुरु करावा यासाठी आज पुन्हा पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान मनसेचे पदाधीकारी संतोष धुरी आणि शिवसेनेचे आमदार सुनिल शिॅदे यांच्यात चांगलाच राडा झाला. संतोष धुरींनी यांनी अधिकारी लोकप्रतिनिधींना कधीच विश्वासात घेत नाहीत असा आरोप केला. त्यास प्रतीउत्तर देताना शिंदे यांनी शिवसेनाच प्रत्येक वेळी जनतेसाठी रस्त्यावर उतरत असल्याचे म्हणाला. एकमेकांनी केलेल्या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या दोघांमध्ये धक्काबुक्की झाली.

लोअर परेल रोड ओव्हब्रीजचा काही भाग पादचाऱ्यांसाठी सुरु करावा की नाही यासंदर्भात बुधवार २५ जुलै रोजी पालिका आयुक्त, रेल्वे अधिकारी, आमदार अजय चौधरी आणि सुनिल शिंदे, वाहतूक पोलिस यांच्यात एक संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीनंतर आज पुन्हा पुलाची पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान रेल्वेचे अधिकारी, पालिका अधिकारी, स्थानिक आमदार आणि अतर पक्षाचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या पाहणी दरम्यान, अधिकारी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नाही असा आरोप संतोष धुरींनी केला. त्याच वेळेस तेथे उपस्थित असलेले सेनेचे आमदार सुनिल शिंदे यांनी त्या आरोपाचे खंडन करित, शिवसेनाच प्रत्येक वेळी जनतेसाठी रस्त्यावर उतरत असल्याचे वक्तव्य करताच दोघांमध्ये चांगलीच जुंपली. हे एवढ्यावच थांबले नाही, तर दोघांनी एकमेकांना धक्काबुक्कीसुद्धा केली. काही काळ पुलाचा विषय बाजुला सारुन सर्वांनी त्यांना आवरते घेतले.

शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांना उद्धव ठाकरेंपेक्षा मुख्यमंत्री जवळचे - रवी राणा

पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरील अंघेरी रेल्वेस्थानकाजवळील पुलाचा भाग कोसळ्याच्या दुर्घटनेनंतर रेल्वे आणि मुंबई महापालीकेने केलेल्या सर्व्हेक्षणानंतर लोअर परेल पुल धोकादायक स्थितीत असल्याचे स्पष्ट करुन रेल्वे आणि महापालिकेने २४ जुलै पासून हा पूल पूर्णतः बंद केला होता. मध्य मुंबईला पूर्व-पश्चिमेस जोडणारा सगळ्यात महत्त्वाचा हा पूल असून, त्यावरुन दररोज 9 लाख लोक प्रवास करतात आणि 2 लाखापेक्षा जास्त वाहनं ये-जा करतात. पूल सुरक्षेच्या दृष्टीने बंद केला असला तरी या पूलावरून प्रवास करणाऱ्यांनी आता रोज जायचं कसं असा प्रश्न निर्माण झाला होता. गुरुवारी करण्यात आलेल्या पाहणीनंतर, ना. म. जोशी मार्गाकडे जाणारी बाजू पादचाऱ्यांसाठी आज सुरु करण्यात येणार आहे. पण, त्यापूर्वी रेल्वेप्रशासनाकडून पुलावर मार्किंग करण्यात येईल, आणि त्यानंतरच तो पादचाऱ्यांसाठी सुरु होणार असल्याची माहिती वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी न्यूज18 लोकमतला दिली.

हेही वाचा...

'मराठी' तरूणांनो जीव गमावू नका, तुमची वाट पाहणारं घरी कुणीतरी आहे! - राज ठाकरे

मराठा मोर्चात आणखी एका आंदोलकाचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

PHOTOS: मुंबईसारखीच दिल्लीही तुंबली

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 26, 2018 04:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close