शिवसेनेनंही जैन मुनींकडून मागितला होता मतांचा जोगवा

शिवसेनेनंही जैन मुनींकडून मागितला होता मतांचा जोगवा

2014 च्या लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेनं जैनमुनींची मदत घेतल्याचा व्हिडिओ समोर आलाय.

  • Share this:

23 आॅगस्ट : मीरा-भाईंदरमध्ये मुनी आणि मनी यांच्यामुळेच भाजपचा विजय झाला असा घणाघाती आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला खरा पण शिवसेनेनंही मतांचा जोगवा मागण्यासाठी जैन मुनींची मदत घेतल्याचं आता समोर आलंय. त्यामुळे सेनेची चांगलीच पोलखोल झालीये.

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत सत्तेचं स्वप्न पाहणाऱ्या शिवसेनेच्या पदरी निराशाच आली. भाजपने एकहाती सत्ता राखत पालिकेवर झेंडा फडकवलाय. सेनेला फक्त 22 जागा मिळाल्यात.

मीरा-भाईंदरच्या पराभवावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मीरा-भाईंदर महापालिकेची निवडणूक भाजपने मनी आणि मुनीच्या बळावर जिंकली असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

मात्र, 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेनं जैनमुनींची मदत घेतल्याचा व्हिडिओ समोर आलाय. शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांच्या लोकसभा प्रचारात जैनमुनी सहभागी झाले होते.

एवढंच नाहीतर मुंबईचा आग्रह धरणाऱ्या शिवसेनेच्या या प्रचारसभेत जैनमुनी 'बॉम्बे' असा उच्चार करत होते.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या मुनींच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते तेच मुनी शिवसेनेच्या प्रचार सभेतही होते अशी शक्यता आहे.

नेहमी या ना विषयावरुन सेना आणि भाजपमध्ये तूतूमैंमैं सुरूच असते. आता जैन मुनींच्या सहभागावरुन सेना आणि भाजपमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2017 07:17 PM IST

ताज्या बातम्या