'राजसाहेब बाहेर या', दसरा मेळावा आटोपून शिवसैनिक 'कृष्णकुंज'वर

'राजसाहेब बाहेर या', दसरा मेळावा आटोपून शिवसैनिक 'कृष्णकुंज'वर

ती म्हणजे शिवाजी पार्कवरील शिवसेनेचा दसरा मेळाव्याची सांगता झाल्यावर काही शिवसैनिकांनी, मैदानाशेजारीच असलेल्या कृष्ण कुंज या राज ठाकरेंच्या निवासस्थानी गर्दी केली आणि चक्क राज ठाकरेंना भेटलेही.

  • Share this:

उदय जाधव, 01 आॅक्टोबर : शिवसेनेचा दसरा मेळावा संपल्यावर एक आश्चर्यकारक घटना घडलीय. ती म्हणजे शिवाजी पार्कवरील शिवसेनेचा दसरा मेळाव्याची सांगता झाल्यावर काही शिवसैनिकांनी, मैदानाशेजारीच असलेल्या कृष्ण कुंज या राज ठाकरेंच्या निवासस्थानी गर्दी केली आणि चक्क राज ठाकरेंना भेटलेही.

दसरा मेळावा आटोपून शिवसैनिकांचा एक जत्था मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानासमोरून जात होता. त्यावेळी राजसाहेब आपल्या घरातील तळमजल्यावर काचेच्या खोलीत काहीतरी लिहीत किंवा रेखाटत होते. काचेच्या खोलीतून राजसाहेब  स्पष्ट दिसत असल्याने बाहेरून जाणारे शिवसैनिक अक्षरश: थबकलेच. त्यांनी "राजसाहेब बाहेर या" अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. कृष्णकुंजच्या बाहेर तैनात असलेल्या पोलिसांना न जुमानता तरुण शिवसैनिक राजसाहेबांना बाहेर येण्यास सांगू लागले.

राजसाहेबांनी सुरुवातीला त्यांना आतूनच अभिवादन केले, पण शिवसैनिकांचा आग्रह पाहता राजसाहेब बाहेर आले आणि त्यांनी शिवसैनिकांशी हस्तांदोलन करुन त्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी थेट केलेले हस्तांदोलन आणि त्यांच्या स्मितहास्यामुळे शिवसैनिक भारावून गेले.

त्यामुळे काही शिवसैनिकांच्या मनात अाजही राज ठाकरेंबद्दल आदरभाव असल्याचं दिसून आलंय. या सर्व अचानक घडलेल्या घटनेमुळे पुन्हा एकदा राज ठाकरे आणि शिवसेना यांच्या नात्याबद्दलच्या चर्चा सुरू झाल्यात.

First published: October 1, 2017, 4:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading