शिवसैनिकांना अटक झाल्यास वर्षावर ठिय्या आंदोलन करा - उद्धव ठाकरे

शिवसैनिकांना अटक झाल्यास वर्षावर ठिय्या आंदोलन करा - उद्धव ठाकरे

शिवसैनिकांचं अटकसत्र सुरू झाल्यास मंगळवारी हजारो शिवसैनिक नगरहून मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानी वर्षावर दाखल होणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 15 एप्रिल : अहमदनगर दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी मातोश्रीवर  उद्धव ठाकरेंची भेट घेतली. शिवसेना नेते अनिल राठोड, लोखंडे, संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यावेळी उपस्थित होते . शिवसैनिकांचं अटकसत्र सुरू झाल्यास मंगळवारी हजारो शिवसैनिक नगरहून मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानी वर्षावर दाखल होणार आहेत. शिवसैनिकांना अटक झाल्यास वर्षावर ठिय्या आंदोलन करण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिले.

उद्या हत्या झालेल्या शिवसैनिकांचे दहावं झाल्यानंतर शिवसैनिकांना अटक करण्याचे एसपींना आदेश असल्याचे शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले.यासाठी उद्या रामदास कदम, एकनाथ शिंदे, विशाखा राऊत आणि किशोरी पेडणेकर नगरला केडगावला जाणार आहेत.

केडगाव येथे ७ एप्रिलला संजय कोतकर आणि वसंत ठुबे या दोन शिवसैनिकांची हत्या झाली. या हत्येनंतर शिवसैनिकांनी रास्ता रोको, दगडफेक, पोलीस कर्मचारी, अधिका-यांना धक्काबुक्की व वाहनांची तोडफोड केली होती. याप्रकरणी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासह सेनेचे नगरसेवक, पदाधिका-यांसह ६०० जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

25 एप्रिलला सकाळी 10 वाजता उद्धव ठाकरे अहमदनगरला घटनास्थळी भेट देणार आहेत.  हत्या झालेल्या शिवसैनिकांच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 15, 2018 03:27 PM IST

ताज्या बातम्या