दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात शिवनेरी बस दुभाजकाला धडकून झाली पलटी !

दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात शिवनेरी बस दुभाजकाला धडकून झाली पलटी !

एका दुचाकीस्वाराला वाचवताना शिवनेरीच्या चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस दुभाजकावर आदळली.

  • Share this:

नवी मुंबई, 22 जून : पुण्याहून मुंबईला येणाऱ्या शिवनेरी बसला काल रात्री नवी मुंबईतील सानपाड्याजवळ अपघात झाला. यामध्ये 5 प्रवासी किरकोळ जखमी झालेत. एका दुचाकीस्वाराला वाचवताना शिवनेरीच्या चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस दुभाजकावर आदळली.

सुदैवानं चालकाला काही झालं नाही. तो सुखरुप आहे. पण दरम्यान यात 5 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. पुण्यावरुन मुंबईला येणाऱ्या या बसमध्ये एकूण २० प्रवासी होते.

हेही वाचा...

VIDEO : डॉक्टराची क्रूरता ; 9 परदेशी कुत्रे भुकेपोटी आपलीच खात होते विष्ठा !

VIDEO : तरुणीचे कारवरील नियंत्रण सुटले, पाच जणांना उडवले

VIDEO : गोंदियात किडनी चोराच्या संशयावरुन भिकाऱ्याचा घेतला जीव

ही राज्य परिवहन महामंडळाची शिवनेरी बस पुण्यातून मुंबईच्या दिशेने येत दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात हा अपघात झाला. त्यात काल रात्री नवी मुंबई परिसरात हलक्या पावसाच्या सरी बरसत होत्या. त्यामुळे रस्ता ओला आणि घसरडा झाला होता.

त्यामुळे मोटार सायकल स्वारास वाचवण्यात बस जाऊन पुलाच्या दुभाजकाला धडकून पलटी झाल्याचं प्रवाश्यांकडून सांगण्यात येतंय आहे.

 

अंधश्रद्धेचा बळी!, अमर होण्यासाठी पोटच्या गोळ्यासह 'त्या'ने पाच जणांना संपवलं

दुधी भोपळा जीवावर बेतला, रस प्यायल्यामुळे महिलेचा मृत्यू

इंग्रजीचं महत्व होणार कमी?, नवी शिक्षणनीती लवकरच !

First published: June 22, 2018, 7:31 AM IST

ताज्या बातम्या