मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /शिवभोजन थाळी सुद्धा 'पार्सल' मिळणार, नवे नियम जाहीर

शिवभोजन थाळी सुद्धा 'पार्सल' मिळणार, नवे नियम जाहीर

राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे सर्व हॉटेल, रेस्टॅारंट यांना पार्सल सुविधाच देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे सर्व हॉटेल, रेस्टॅारंट यांना पार्सल सुविधाच देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे सर्व हॉटेल, रेस्टॅारंट यांना पार्सल सुविधाच देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

मुंबई, 06 एप्रिल : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे मिनी लॉकडाऊन (Weekend Lockdown) लावण्यात आला आहे. त्यामुळे अनेक निर्बंध (Maharashtra Night Curfew) घालण्यात आले आहे. हॉटेल आणि रेस्टारंट बंद ठेवण्यात आले असून पार्सल सुविधा सुरू आहे. आता राज्यात शिवभोजन थाळी (shiv bhojan thali) ही पार्सल स्वरूपात जनतेला उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.

कोरोना काळात मजुर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला शिवभोजन थाळी मोठा आधार देत आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे सर्व हॉटेल, रेस्टॅारंट यांना पार्सल सुविधाच देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता शिवभोजन केंद्रावर देखील शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात उपलब्ध होणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

मोठी बातमी, सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर

'सरकारने लागू केलेल्या सर्व नियमांचे पालन जनतेने करावे आणि प्रशासनाला मदत करावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या पार्सल सुविधेच्या निर्णयामुळे शिवभोजन थाळीच्या किंमतीमध्ये कोणताही बदल आपण केला नाही. पूर्वीप्रमाणेच 5 रूपयात शिवभोजन थाळी सर्व सामान्य जनतेला उपलब्ध होणार आहे, अशी माहितीही भुजबळ यांनी दिली.

शशांक केतकरची बहीणही मालिकेत दिसणार; न्यूयॉर्कमध्ये घेतलेत अभिनयाचे धडे

'कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला थांबविण्यासाठी सरकारने "ब्रेक दि चेन" या मोहिमेच्या अंतर्गत काही कडक निर्बंध लागू केले आहेत. या नियमांच सर्वांनी पालन केले तरच आपण कोरोनाला रोखू शकतो त्यामुळे सर्वांनी राज्यसरकारला सहकार्य करावे, असं आवाहन देखील मंत्री भुजबळ यांनी केले आहे.

First published:
top videos