Home /News /mumbai /

मुलाने केला घोटाळा, वडिलांनी केला आरोप

मुलाने केला घोटाळा, वडिलांनी केला आरोप

शिक्षणसम्राट अशी ओळख असलेल्या शिवाजीराव जोंधळे यांनी त्यांच्या शैक्षणिक संस्थेत त्यांच्याच मुलाने ४१ लाख ८१ हजार रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.

    कल्याण, 30 जुलै : शिक्षणसम्राट अशी ओळख असलेल्या शिवाजीराव जोंधळे यांनी त्यांच्या शैक्षणिक संस्थेत त्यांच्याच मुलाने ४१ लाख ८१ हजार रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी सीआयडीने तपस करून गुन्हा दाखल केला असून, नुकतंच कल्याण कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. या प्रकरणी सागर जोंधळे यांच्याशी संपर्क केला असता ते आपलं म्हणणं कळवतील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीये. VIDEO : मराठा आंदोलनात नांगरे पाटलांची एंट्री, तरुणाने पडल्या पाया ! शिवाजीराव जोंधळे यांची समर्थ समाज संस्था ही शैक्षणिक संस्था असून, या संस्थेत त्यांचा मुलगा सागर जोंधळे, पत्नी वैशाली जोंधळे हे पदाधिकारी आहेत. या दोघांसह संस्थेच्या इतर विश्वस्तांनी संगनमत करून संस्थेचं बनावट मिनिट बुक तयार केलं आणि संगनमतानं ४१ लाख ८१ हजार रुपयांचा आर्थिक घोटाळा केला. या पैशातून सागर जोंधळे याने स्पिडबोट विकत घेतली. इतकंच नव्हे, तर अध्यक्ष असलेल्या शिवाजीराव जोंधळे यांनाही बाजूला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप स्वतः शिवाजीराव जोंधळे यांनी केलाय. याबाबत जोंधळे यांनी तक्रार केल्यानंतर सीआयडीकडे याप्रकरणाचा तपस देण्यात आला. सीआयडीने तपास करत सागर जोंधळे, वैशाली जोंधळे यांच्यासह एकूण ६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणी कल्याण कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. आपली फसवणूक करणाऱ्यांवर न्यायालयानं कडक कारवाई करावी अशी मागणी शिवाजीराव जोंधळे यांनी केलीये. दरम्यान, या प्रकरणी सागर जोंधळे यांच्याशी संपर्क केला असता, ते आपलं म्हणणं कळवतील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीये. हेही वाचा.. शिवसेनेची बैठक संपली, मराठा आरक्षणासाठी शिवसेना भाजपसोबत! PHOTOS : डॅशिंग नांगरे पाटील मराठा आंदोलनात, कुठे शेकहँड तर कुठे  प्रत्येक जातीला पोट असतं, पण पोटाला जात लावू नका - उद्धव ठाकरे  
    First published:

    Tags: CID, Court, Educational institution, Financial scandal, Kalyan, Shivajirao jondhale, आर्थिक घोटाळा, कल्याण, कोर्ट, शिवाजीराव जोंधळे, शैक्षणिक संस्थेत, सीआयडी

    पुढील बातम्या