मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /शिवाजी महाराज अवमान प्रकरण, मराठी अभिनेत्रीच्या पोस्टने नवा वाद

शिवाजी महाराज अवमान प्रकरण, मराठी अभिनेत्रीच्या पोस्टने नवा वाद

मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने एक फेसबुक पोस्ट लिहिली असून ती चर्चेचा विषय ठरत आहे.

मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने एक फेसबुक पोस्ट लिहिली असून ती चर्चेचा विषय ठरत आहे.

मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने एक फेसबुक पोस्ट लिहिली असून ती चर्चेचा विषय ठरत आहे.

मुंबई, 11 जुलै : महाराष्ट्राचं प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अग्रिमा जोशुआ हिने वादग्रस्त वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला. सोशल मीडियावरही अग्रिआ हिच्याविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. हा वाद ताजा असतानाच मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने एक फेसबुक पोस्ट लिहिली असून ती चर्चेचा विषय ठरत आहे.

'3 वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे, शिवाजी हा एक शब्द ओळखतात आणि महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारून, महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात. बरं, अशा वागण्यानी आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीच. अर्थात हे कळण्यासाठीही नखाएवढी अक्कल लागतेच म्हणा,' असं केतकीने आपल्या फेसबुक पोस्टमधून सोशल मीडियावर राग व्यक्त करणाऱ्यांना फटकारलं आहे.

काय आहे केतकी चितळे हिची फेसबुक पोस्ट?

"शिवाजी, फक्त एवढे ऐकले की आम्ही उगाच पेटून उठणार. मजकूर आम्हाला तसाही कधी कळतच नाही, कारण तेवढी आमची बुद्धीमत्ता मुळातच नाही. मग 3 वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे, शिवाजी हा एक शब्द ओळखतात आणि महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारून, महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात. बरं, अशा वागण्यानी आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीच. अर्थात हे कळण्यासाठीही नखाएवढी अक्कल लागतेच म्हणा!

सोशल मीडियावर 'मराठी' असा शब्द टाकून वाटेल तसा वणवा, काही लाईक्ससाठी पेटवणारे 20 ते 25 वयोगटातील पोरे, ज्यांना खऱ्या आयुष्यात कुणी भाव अथवा नोकरी ही देणार नाही अशी कार्टी, या सर्कसचे रिंग मास्टर असतात.

अरे मूर्खांनो, शालेय शिक्षण तरी घ्या! पण ते तरी कसे घेणार, कारण आमचे प्रेरणास्थान तर आर्ची (नाव ही मराठी नाही) आणि पर्शा! आम्ही फक्त भांडण करण्यासाठी महाराज, बाबासाहेब, फुले यांची नावे घेणार, त्यांनी लिहिलेल्या साहित्याचा अभ्यास कोण करणार!! सुधारणा करा बाळांनो, शिका," अशी आक्रमक पोस्ट केतकीने लिहिली आहे.

First published:

Tags: Shivaji maharaj statue