मराठा क्रांती मोर्चाला शिवसेनेचा पाठिंबा, राऊतांनी दिल्या शुभेच्छा

मराठा क्रांती मोर्चाला शिवसेनेचा पाठिंबा, राऊतांनी दिल्या शुभेच्छा

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मराठा मोर्चाला शुभेच्छा दिल्या आहेत.

  • Share this:

08 आॅगस्ट : मुंबईतील उद्या निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाला शिवसेनेनं पाठिंबा दर्शवलाय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मराठा मोर्चाला शुभेच्छा दिल्या आहेत.

कोपर्डी प्रकरणी निर्भयाला न्याय, स्वामिनाथन आयोगाच्या अंमलबजावणी करावी या मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा उद्या बुधवारी मुंबापुरीत धडकरणार आहे. उद्या सकाळी 11 वाजता वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान ते आझाद मैदानापर्यंत असा हा मोर्चा निघणार आहे. शिवसेनेनं मराठा मोर्च्याला पाठिंबा जाहीर केलाय.  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मराठा क्रांती मोर्चाला शुभेच्छा देत पाठिंबा दर्शवलाय.

महाराष्ट्रातील एका मोठ्या समाजाला त्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. समाज मोठा असो की लहान प्रत्येकाला हक्कासाठी लढण्याचा अधिकार आहे. या निमित्ताने भगव्या झेंडयाखाली शक्ती एकवटत आहे. मराठा क्रांती मोर्चाला शिवसेनेच्या सक्रिय शुभेच्छा आहेतच अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2017 07:41 PM IST

ताज्या बातम्या