VIDEO : संजय राऊत यांच्या फाईलमध्ये दडलंय काय?

VIDEO : संजय राऊत यांच्या फाईलमध्ये दडलंय काय?

ही फाईल नेमकी कसली, या फाईलमध्ये नेमकं काय होतं या पत्रकारांनी विचारलेला प्रश्न दोन्ही नेत्यांनी हसून टाळून नेला.

  • Share this:

मुंबई, 04 नोव्हेंबर : शिवसेना आणि भाजपमध्ये सत्ता स्थापन करण्यावरून सत्ता संघर्ष सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला अंगावर घेतलं आहे. हा राजकीय संघर्ष असताना आता संजय राऊत यांची एक फाईल चर्चेचा विषय ठरली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत आणि रामदास कदम यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. भेट घेऊन परतल्यानंतर या दोघांच्या हातात एक फाईल होती.

ही फाईल नेमकी कसली, या फाईलमध्ये नेमकं काय होतं या पत्रकारांनी विचारलेला प्रश्न दोन्ही नेत्यांनी हसून टाळून नेला. त्यामुळं या फाईलमध्ये नेमकं काय होतं हा चर्चेचा विषय बनला आहे.

दरम्यान, राज्यात सत्तास्थापनेचा जो पेच निर्माण झालाय त्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी राज्यपालांची भेट घेणं याला महत्त्वाचं मानलं जातंय. राज्यपालांची भेट ही सदिच्छा भेट होती. महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवरही चर्चा झाली. आम्ही एका मर्यादेत राहून चर्चा केली. लवकरात लवकरच सरकार स्थापन व्हावं अशी विनंती केली. सरकार स्थापनेसाठी शिवसेना अडथळा ठरणार नाही, असं राऊत यांनी सांगितलं.

तसंच उद्धव ठाकरेंच्या वतीने आम्ही भेटलो. उद्धव ठाकरे यांची आणि बाळासाहेब ठाकरे यांची काही पुस्तकं आम्ही राज्यपालांना भेट दिली अशी माहितीही राऊत यांनी दिली. बाळासाहेबांचं फटकारे हे पुस्तकही राज्यपालांना दिलं.

राज्यात जो काही पेच निर्माण झाल त्यासाठी शिवसेना जबाबदार नाही असंही आम्ही त्यांना सांगितलं. राजभवन हे राजकारणाची जागा नाही. आम्ही राज्यपालांना सूचना देणार नाही. ते अतिशय अनुभवी नेते आहेत, योग्य तो निर्णय घेतील, असंही राऊत यांनी सांगितलं.

'...सफर मे मजा आता है'

निवडणुकीच्या निकालानंतर 12 दिवस उलटून गेले तरी राज्यात सत्ता स्थापनेचं चित्र स्पष्ट झालेलं नाही. भाजप-शिवसेनेमध्ये अद्याप चर्चाच सुरू आहे. शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसली आहे. तर भाजप त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे. यामुळे दोन्ही पक्षात तणाव निर्माण झाला आहे. यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आतापर्यंत पत्रकार परिषदेतून भाजपला थेट इशाराच दिला आहे. शिवतिर्थावर शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. दरम्यान, आज राऊत यांनी केलेल्या ट्विटने पुन्हा नव्या चर्चेला उधाण आलं आहे.

===========================

First published: November 4, 2019, 9:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading