मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

शिवसेनेचा 'रासगरबा', 21 गुजराती उद्योजक शिवबंधन बांधणार!

शिवसेनेचा 'रासगरबा', 21 गुजराती उद्योजक शिवबंधन बांधणार!

मागील महिन्यात जोगेश्वरीमध्ये गुजराती बांधवांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता.

मागील महिन्यात जोगेश्वरीमध्ये गुजराती बांधवांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता.

मागील महिन्यात जोगेश्वरीमध्ये गुजराती बांधवांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता.

  • Published by:  sachin Salve
मुंबई, 07 फेब्रुवारी : मुंबई महापालिका निवडणूक (mumbai municipal corporation election 2022) पुढील वर्षी होणार आहे. पण आतापासूनच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेनेनं (Shivsena) पुन्हा एकदा गुजराती (Gujrati) मतदारांना आकर्षित करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात 21 उद्योगपती आणि व्यावसायिक शिवसेनेत प्रवेश करणार आहे. शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांनी रविवार 10 जानेवारी 2021 रोजी  मुंबईमधील गुजराती बांधवांचा मेळावा कमालीचा यशस्वी करुन दाखविल्यानंतर आता मालाड येथे आज 7 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास B2B अग्रवाल बिझनेस सेंटर, काचपाडा, मालाड (पश्चिम) इथं गुजराती बांधवांचा दुसरा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे प्रमुख आकर्षण 'रासगरबा'  असून नवरात्र उत्सव गाजविणाऱ्या प्रीती, पिंकी आणि भूमी त्रिवेदी यांच्या मधुर स्वरांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक जिगर सोनी आणि सुह्रुद सोनी या सोनी बंधूंच्या मार्गदर्शनाखाली हा रासगरबा रंगणार आहे. या मेळाव्यात 21 गुजराती उद्योगपती आणि व्यावसायिक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तसंच कालाच शिवसेनेत पक्ष प्रवेश केलेले भाजपचे माजी आमदार हेमेंद्र मेहता या रासगरबा कार्यक्रमास उपस्थित रहाणार आहेत. कोरोना संकटाच्या वातावरणात सर्व नियमांचे पालन करण्यात येणार असून प्रथम येणाऱ्या शंभर लोकांना सभागृहात प्रवेश देण्यात येणार आहे. मागील महिन्यात जोगेश्वरीमध्ये गुजराती बांधवांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात सुद्धा गुजराती बांधवांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीच्या वेळी आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले होते. त्यावेळी 'केम छो वरळी' असं म्हणत गुजराती बांधवांना साद घातली होती. शिवसेनेच्या या भूमिकेवर विरोधकांनी टीका केली होती. पण, निवडणुकीत शिवसेनेला याचा फायदा झाला होता. आताही पालिका निवडणुकीच्या तोंडावर सेनेनं भाजपला शह देण्यासाठी पुन्हा गुजराती कार्ड वापरणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
First published:

Tags: Mumbai

पुढील बातम्या