Home /News /mumbai /

संभाजी राजेंनी पक्षप्रवेश नाकारल्यास शिवसेनेचा प्लान बी तयार; कोणाला मिळणार उमेदवारी? 

संभाजी राजेंनी पक्षप्रवेश नाकारल्यास शिवसेनेचा प्लान बी तयार; कोणाला मिळणार उमेदवारी? 

विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेचा मेगा प्लान, उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय

विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेचा मेगा प्लान, उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय

छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेचं पक्ष प्रवेशाचं निमंत्रण स्वीकारलं नाही, तर शिवसेनेचा प्लान बी तयार असल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती समोर आली आहे.

    मुंबई, 22 मे : छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेचं पक्ष प्रवेशाचं निमंत्रण स्वीकारलं नाही, तर शिवसेनेचा प्लान बी तयार असल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती समोर आली आहे. शिवसेनेच्या प्लान बीनुसार ग्रामीण महाराष्ट्रातील चार कट्टर शिवसैनिकांचे उमेदवारी अर्ज तयार असल्याची माहिती समोर आली आहे. आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने छत्रपती संभाजीराजे यांची ट्रायडंट हाॅटेलमध्ये भेट घेऊन त्यांना उद्या शिवसेना पक्ष प्रवेशाचं निमंत्रण दिलं आहे. शिवसेनेच्या निमंत्रणाला संभाजीराजे छत्रपती काय प्रतिसाद देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी उद्या शिवसेनेत पक्ष प्रवेश नाही केला तर शिवसेनेच्या प्लान बी प्रमाणे कट्टर शिवसैनिकाला उमेदारी जाहीर करण्यात येणार आहे. शिवसेनेच्या प्लान बी प्रमाणे ग्रामीण महाराष्ट्रातील चार कट्टर शिवसैनिकांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कागदपत्र तयार असल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे. शिवसेनेच्या प्लान बी नुसार शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ग्रामीण महाराष्ट्रातील चार पैकी एका कट्टर शिवसैनिकाची राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर करणार असल्याचं समजते.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Sambhajiraje chhatrapati, Shivsena, Uddhav Thackeray (Politician)

    पुढील बातम्या