S M L
Football World Cup 2018

डोंबिवलीमध्ये शिवसैनिकांनी फेरीवाल्यांना हुसकावलं

शिवसेना युवा सेना आणि महिला आघाडीच्या महिलांना या फेरिवाल्यांवर एकच हल्लाबोल केला.

Sachin Salve | Updated On: May 15, 2017 07:17 PM IST

डोंबिवलीमध्ये शिवसैनिकांनी फेरीवाल्यांना हुसकावलं

15 मे : डोंबिवलीमध्ये फेरीवाल्यांच्या विरोधात शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतलीये. सेनेच्या युवासैनिकांनी स्टेशन परिसरातील फेरिवाल्यांना हुसकावून लावलं.

डोंबिवली रेल्वे स्टेशन पूर्व भागाला फेरीवाल्यांनी गराडा घातलाय. महापालिकेनं कारवाई करूनही फेरीवाले पुन्हा आपले दुकानं मांडतात. आज (सोमवारी) शिवसेना युवा सेना आणि महिला आघाडीच्या महिलांना या फेरिवाल्यांवर एकच हल्लाबोल केला. फेरिवाल्यांच्या गाड्या उद्ध्वस्त करत हुसकावून लावलं. अनेक फेरीवाल्यांना सामानाची नासधुस करत पिटाळून लावलं.

महापालिका फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात अपयशी ठरली त्यामुळेच आम्हाला या फेरीवाल्यांना हुसकावून लावावे लागले असं स्पष्टीकरण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 15, 2017 07:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close