शिवसैनिकाने महिला पत्रकाराला भररस्त्यात केली अश्लील शिवीगाळ

शिवसैनिकाने महिला पत्रकाराला भररस्त्यात केली अश्लील शिवीगाळ

मराठी वृत्तपत्राच्या महिला पत्रकाराला एका शिवसैनिकाने अश्लील शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वसईत ही घटना घडली.

  • Share this:

मुंबई, 7 ऑगस्ट- मराठी वृत्तपत्राच्या महिला पत्रकाराला एका शिवसैनिकाने अश्लील शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वसईत ही घटना घडली. शेखर वैद्य असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात वसई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आला आहे. शेखर वैद्य याने महिला पत्रकार वैष्णवी राऊत यांना मंगळवारी दुपारी भररस्त्यात अश्लील शिवीगाळ केली होती.

NUJM कडून तीव्र निषेध..

नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस महाराष्ट्र (NUJM)पालघर जिल्ह्याच्या वतीने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी, अशी मागणी संघटनेच्या महाराष्ट्र अध्यक्षा शीतल करदेकर, कोषाध्यक्ष वैशाली आहेर, सचिव सीमा भोईर यांनी केली आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

जाणता राजा शिवाजी महाराज महिलांचा सन्मान करत होते. मात्र, शिवसेना पक्षाचे हे कार्यकर्ते महिला पत्रकाराला अश्लील शिवीगाळ करत आहे. त्यांना धमकावत आहे, हा प्रकार निंदनीय आहे. आरोपी शेखर वैद्य याला अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी शीतल करदेकर यांनी केली आहे.

महापौरांनी पिरगळला महिलेचा हात

मुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये महापौरांनी एका महिलेचा चक्क हातच पिरगळल्याचे दिसत आहे. मुंबईतल्या मुसळधार पावसामुळे सांताक्रूजमधल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरले. त्यात एका कुटुंबातल्या माय लेकाचा विजेचा शॉक लागून मृत्यूही झाला. यावेळी महापौरांना भेटीसाठी वारंवार विचारणा करुनही महापौर आले नसल्याने स्थानिक रहिवाशांनी आंदोलन केले. सोमवारी महापौर भेटण्यासाठी गेले असताना स्थानिकांनी महापौरांना घेराव घातला, पण यावेळी महिला आपला रोष व्यक्त करत असतानाच महापौरांनी थेट महिलेचा हात पिरगळला.

Published by: Sandip Parolekar
First published: August 7, 2019, 2:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading