2019ची लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार!

स्वबळाचा ठराव शिवसेने नेते संजय राऊत यांनी मांडला आणि त्याला खासदार अनिल देसाई यांनी अनुमोदन केले.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jan 23, 2018 01:33 PM IST

2019ची लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार!

23 जानेवारी : 2019 ची लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार आहे. सेनेच्या मंगळवारी वरळी येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत स्वबळाची घोषणा करण्यात आली.स्वबळाचा ठराव शिवसेने नेते संजय राऊत यांनी मांडला आणि त्याला खासदार अनिल देसाई यांनी अनुमोदन केले.

शिवसेनेचे सध्या 19 खासदार असून 63 आमदार आहेत. 2019 च्या निवडणुकांमध्ये 25 खासदार आणि 150 पेक्षा अधिक आमदार निवडून आणण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला आणि सभागृहातील मोठ्या संख्यने उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांनी हात उंचावून आपण सज्ज असल्याचे दाखवून दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 23, 2018 01:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...